• Download App
    काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता ठाकरे गटाशीच आघाडीचा पर्याय खुला?? Not only the Congress, but Prakash Ambedkar now has the option of an alliance with the Thackeray group

    काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता ठाकरे गटाशीच आघाडीचा पर्याय खुला??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशीच आघाडीचा पर्याय उरला आहे का?, असा सवाल तयार झाला आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना शिवसेनेतल्या फुटी पूर्वीच वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करून मुंबई सह सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लढवण्याचे आवाहन केले होते. Not only the Congress, but Prakash Ambedkar now has the option of an alliance with the Thackeray group

    मात्र बराच काळ वाट पाहूनही त्यांना दोन्ही पक्षांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये विशेषत: गेल्या आठवड्याभरात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने शरसंधान साधले आहे. राहुल गांधींची रथयात्रा फोल ठरते आहे. त्यांच्या यात्रेत गर्दी होते आहे. पण त्या यात्रेला खरी दिशाच नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. या टीकेला अशोक चव्हाणांनी उत्तर देखील दिले.


    एकीकडे प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला आघाडीची ऑफर; दुसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर शरसंधान


    पण एकूण आता प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहूनच काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे दरवाजे आपल्या वक्तव्यातूनच बंद केल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकर यांना आता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशीच आघाडी करण्याचा पर्याय शिल्लक आहे का? असा प्रश्न तयार झाला आहे. यासाठी शिवसेनेतून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे प्रयत्न करत असल्याची सोशल मीडियात चर्चा आहे.

    उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक यु टर्न घेत काँग्रेस + राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. ते सत्तेवर बसले. शिवसेना फुटीनंतर संभाजी ब्रिगेड आणि कम्युनिस्ट पक्षांचा पाठिंबा घेतला. बाळासाहेब ठाकरे यांना कायम विरोध करणाऱ्या पुरोगामी लिबरल विचारवंतांशी सलगी वाढवली. मग आता त्यापुढे जाऊन ते राजकीय अपरिहार्यता म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करणार का? आणि त्यासाठी नीलम गोऱ्हे प्रयत्न करत आहेत का?, असा सवाल सोशल मीडियातून विचारला जात आहे.

    तशीही महाविकास आघाडी आता केवळ कागदावर अस्तित्वात उरली आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याचे भासवले जात असले तरी काँग्रेसचे 22 आमदार फुटून देवेंद्र फडणवीस यांना मिळतील, असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना नाना पटोले यांनी चांगलेच फटकारले होते. त्यानंतर प्रदेश पातळीवर तरी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांचे सख्ख्य उरले नसल्याचे दिसले होते. बाकी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना निमंत्रण जरूर आहे. पण ते कुठे आणि केव्हा सामील होणार?, हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर नीलम गोऱ्हे यांनी अजित पवारांची कुठलीच गॅरेंटी नाही असे सांगून राष्ट्रवादी बरोबर देखील नेमके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कितपत जमू शकेल? याविषयी स्वतःच शंका उपस्थित केली आहे.

    या सर्व राजकीय घडामोडींचा अर्थ एवढाच असू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय तडजोड करू शकेल. किंबहुना आता प्रकाश आंबेडकरांसाठी तरी तोच एकमेव पर्याय शिल्लक राहिला असेल.

    Not only the Congress, but Prakash Ambedkar now has the option of an alliance with the Thackeray group

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात