Rajesh Tope on Virar hospital fire : विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयाती कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा देश हळहळत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ही काही नॅशनल न्यूज नाही. राज्य सरकार योग्य ती कारवाई करत आहे. राजेश टोपेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. Not national news says Maha minister Rajesh Tope on Virar hospital fire which killed 13
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयाती कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा देश हळहळत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ही काही नॅशनल न्यूज नाही. राज्य सरकार योग्य ती कारवाई करत आहे. राजेश टोपेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे.
पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये आयसीयू कक्षाला आग लागली. या आगीचे एसीमध्ये झालेला शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची घटना शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता घडली. रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोप केलाय की, आग लागली त्यावेळी कर्मचाऱ्यांना रुग्णांन आत सोडून तेथून पळ काढला. या दुर्घटनेला हेळसांड, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. एवढी मोठी घटना होऊनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र अतिशय असंवेदनशील वक्तव्य केले आहे. ही नॅशनल न्यूज नाही, म्हणजे फार काही मोठी घटना नाही, असे राजेश टोपे यांना सूचवायचे आहे काय? तेरा जणांचा मृत्यू होतो, या मृत्यूंचे काहीच मोल नाही का? असे सवाल आता विचारले जात आहेत.
काय म्हणाले राजेश टोपे?
कोविड सेंटरला आग लागल्याच्या घटनेनंतर माध्यमांना सामोरे जाताना राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकारच्या पातळीवर कारवाई करण्यात येणार आहे. ही काही नॅशनल न्यूज नाही. राज्य सरकार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी आवश्यक पावले उचलत आहे. टोपे पुढे म्हणाले की, राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय मनपा प्रशासनातर्फेही यात 5 लाखांची मदत जोडली जाणार आहे.
टोपे पुढे म्हणाले की, आम्ही या घटनेच्या चौकशीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. पुढच्या दहा दिवसांत यावरील अहवाल येईल. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अनिवार्य असलेले फायर आणि स्ट्रक्चर ऑडिट न केल्याबद्दल जबाबदार व्यक्तींना शासन होईल.
13 जणांचा हकनाक बळी
शुक्रवारी पहाटे विरार पश्चिम येथील विजय वल्लभ या चार मजली कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये आग लागली. यावेळी तेथे 15 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा होरपळून करुण अंत झाला. या मृतांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. विरार अग्निकांडातील मृतांच्या नातेवाइकांना केंद्रातर्फे पंतप्रधान सहायता निधीमधून 2 लाख व गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
नुकतेच नाशिक मनपाच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन गळती होऊन 24 जणांचे प्राण गेले. ही घटना ताजी असतानाच आता विरारमधील घटनेमुळे रुग्ण सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 13 जीव हकनाक बळी जातात, ही घटना नॅशनल न्यूज नसल्याचे म्हटल्याने आरोग्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
Not national news says Maha minister Rajesh Tope on Virar hospital fire which killed 13
महत्त्वाच्या बातम्या
- विरार अग्निकांड : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून ५ लाखांची, तर केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर
- Corona in India : चिंता वाढली! देशात २४ तासांत तब्बल ३.३२ लाखांहून अधिक रुग्णांचा नोंद, २२५६ मृत्यू
- ताई एकदम ठणठणीत, तरीही नेत्यांकडून त्यांच्या निधनाचे ट्वीट, वाचा काय म्हणाल्या सुमित्राताई महाजन!
- भय इथले संपत नाही : कोरोना रुग्णांचा वाली कोण? सरकार मागच्या घटनांवरून धडा घेणार की नाही?
- पुन्हा मृत्यूचे तांडव : विरारमधील कोविड सेंटरला भीषण आग; ICUमधील १५ पैकी १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू