• Download App
    B. R. Shankaranand इंडिया नव्हे भारत हाच नव्या शिक्षण धोरणाचा स्पष्ट संदेश , बी. आर. शंकरानंद यांचे प्रतिपादन

    इंडिया नव्हे भारत हाच नव्या शिक्षण धोरणाचा स्पष्ट संदेश , बी. आर. शंकरानंद यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : इंडिया शब्द मनातून काढून टाकून मन, वचन व कर्म या तीनहीमध्ये भारत बनवायचा आहे. भारतीय ज्ञान संपदेला केवळ शिक्षण क्षेत्रात नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू करायचे. नव्या शिक्षण धोरणाचा हाच स्पष्ट संदेश आल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री बी. आर. शंकरानंद यांनी केले.

    अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ (ADYPU), भारतीय शिक्षण मंडळ आणि जम्मू-काश्मीर येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित“राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP-2020) आणि भारतीय ज्ञान संपदा (IKS): एक व्यावहारिक दृष्टीकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमचे (NETF) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक , डॉ. शैलेन्द्र देवळणकर सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ़ काश्मीरचे कुलगुरू ए. रवींद्रनाथ उपस्थित हाेते.
    शंकरानंद म्हणाले, दृष्टी, विचार, ज्ञान आणि विज्ञानही भारतीय बनायला हवे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाचा हाच स्पष्ट संदेश आहे.

    शिक्षण क्षेत्रात भारतीयत्व हवे. भारतीय ज्ञान संपदा हा केवळ एक विषय असून शकत नाही तर प्रत्येक विषयात भारतीय ज्ञान संपदा असायला हवी. उपदेशाने देश बदलत नाही. त्यासाठी स्वत:ला बदलावे लागेल. अनेक गाेष्टींमुळे भारताची जगात बेईगज्जती हाेते. त्यामुळे आता या गाेष्टींवर ‘नहीं चलेगा’ अशी भूमिका घ्यायला हवी. प्रत्येक गाेष्टीत उच्च गुणवत्तेचा आग्रह धरायला हवा.

    सध्या शिक्षणाचा उद्देश केवळ नाेकरी मिळविणे हा झाला आहे. ताे बदलून माणूस घडविणे असायला हवा. त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने राबवावा असे आवाहन शंकरानंद यांनी केले.
    डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले 1835 साली मॅकोलेने जबरदस्तने इंग्रजी माध्यमात शिकविण्याची सक्ती केली. आपण पूर्ण अडाणी असल्याचे भारतीयांच्या मनावर बिंबवले. यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास पूर्ण संपला होता. नवीन शिक्षण धोरणाने यात बदल घडविला आहे. उच्च शिक्षणही मातृभाषेतून दिले पाहिजे.

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ७५ वर्षे भारतीय ज्ञान परंपरेकडे दूर्लक्ष झाले. मात्र, नव्या शैक्षणिक धाेरणाने शिक्षण क्षेत्रात नवे बदल घडविले आहेत, असे सांगून डाॅ. सहस्त्रबुध्दे म्हणाले, भारतीय ज्ञान संपदेचा वापर केला तर २०४७ पूर्वीच विकसित भारताचे स्वप्न पूर्णू होईल.
    डाॅ. शैलेंद्र देवळणकर म्हणाले, नव्या राष्ट्रीय शिक्षणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राष्ट्रीय शिक्षण धाेरण आणि भारतीय ज्ञान संपदा या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत.

    अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन यांनी स्वागत केले. परिषदेचे निमंत्रक डॉ. विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीकांत धारुरकर आणि प्रा. संगीता वर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

    Not India, but Bharat is the clear message of the new education policy, asserts B. R. Shankaranand

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगे फिरले, आता अजितदादांचे राजकारण येवल्याचा अलिबाबा आणि परळी गॅंग संपवत असल्याचे आरोप केले

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- सर्व काही एकाच समाजाला, तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल