• Download App
    उत्तर - बुस्टर - मास्टर; जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!! North - Booster - Master; Teasers of meetings that drive people crazy

    उत्तर – बुस्टर – मास्टर; जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर – बुस्टर – मास्टर, जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!, अशी एक विचित्र स्पर्धा महाराष्ट्रात तयार झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांमध्येच आपले हिंदुत्व खरे ठरविण्याची स्पर्धा लागली आहे. North – Booster – Master; Teasers of meetings that drive people crazy

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेपासून आधी टीझर लॉन्च करण्याची पद्धत सुरु झाली. त्यामुळे सभेला आपसूकच गर्दी जमत असते. हा ट्रेंड आता भाजप आणि शिवसेनेनेही स्वीकारला आहे. भाजपने नुकतीच सायन येथे सभा घेतली होती, त्याला बुस्टर सभा म्हणून त्याचा टीझर लॉन्च केला होता, आता शिवसेनेची १४ मे रोजी सभा होत आहे. तर त्यासाठी बुस्टर नाही मास्टर असा टीझर तयार केला आहे.



    शिवसेनेने येत्या १४ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात विराट सभा आयोजित केली आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार असून या सभेचा एक ‘टीझर’ शिवसैनिकांनी व्हायरल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार याची झलक या टीझरमधून पाहिला मिळत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुद्देसुद उत्तर देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे या टीझरमध्ये दिसते आहे.

    हो आम्ही मराठीच, आम्हीच महाराष्ट्रीय, आम्हीच मुंबईकर… आणि कायम गर्वाने हिंदू. हे सर्व आम्हाला भोंगे लावून, भगव्या शाली पांघरुन मोठ्या आवाजात रेकून सांगावं लागत नाही. डोस घ्यायचा सोस असेल तर ठोस सांगतो, नकली हिंदुत्ववाद्यांना आरसा आणि हिंदुहृदयसम्राटांचा वारसा दाखवायला येत आहोत, महामेळावा मुंबई… बुस्टर नाही मास्टर.. १४ मे बीकेसी… हाच तो टीझर आहे!!

    North – Booster – Master; Teasers of meetings that drive people crazy

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार