प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशीन वरील भुंग्याने विरोधात जोरदार भूमिका घेत तरी त्यांच्या सभा गाजू लागल्या आणि आता एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्याविरोधात 6 एप्रिल रोजी अजामीनपात्र अटक जारी करण्यात आले होते. सांगली येथील शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंवर वाॅरंट जारी करुनही अद्याप कारवाई का करण्यात आली नाही?, असा सवाल पोलिसांना केला आहे. 28 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आलेले हे पत्र आज 3 मे रोजी समोर आले आहे.
Non-bailable arrest warrant issued against Raj Thackeray, but in the 2008 case
जामीन मिळणार नाही
राज ठाकरेंवर 143, 109, 117 अशी कलमे लावण्यात आली आहेत. 2008 सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात हे वाॅरंट जारी केले आहे. विशेष म्हणजे हे वाॅरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या वाॅरंटेमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. शिराळ्यातील न्यायदंडाधिका-यांनी हे वाॅरंट जारी केले आहे.
– अजामीनपात्र वाॅरंट जारी
राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, शिराळा न्यायालयाने जुन्या प्रकरणात वाॅरंट जारी केले आहे. याआधीही राज ठाकरेंविरोधात वाॅरंट जारी करण्यात आली होती तेव्हा ते चौकशीला हजर राहिले नाहीत. जामीन देऊनही राज ठाकरे चौकशीला हजर न राहिल्याने, अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आले आहे.
Non-bailable arrest warrant issued against Raj Thackeray, but in the 2008 case
महत्वाच्या बातम्या