• Download App
    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!! Nomination for Ujjwal Nikam from North Central Mumbai

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभेत भाजपकडून धडाडणार आहे कायद्याची तोफ. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह दहशतवाद्यांविरुद्धचे अनेक सरकारी खटले लढवणारे तडफदार वकील उज्वल निकम यांना भाजपने उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे त्यांचा सामना काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे. Nomination for Ujjwal Nikam from North Central Mumbai

    उज्वल निकम ज्येष्ठ विधीज्ञ असून ते महाराष्ट्राचे महाधिवक्ते होते. मुंबई बॉम्बस्फोटापासून दाऊद इब्राहिम पर्यंतचे अनेक दहशतवादी खटले तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कसाब विरुद्धचा खटला उज्ज्वल निकम यांनी सरकारच्या बाजूने कोर्टामध्ये लढवला होता. या सर्व सरकारी खटल्यांमध्ये 100 % यश मिळाले. भाजपने आता त्यांच्या कायद्याच्या अभ्यासाचा वापर थेट लोकसभेत करवून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांना लोकसभेवर निवडून आणून त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे काम सोपवण्याचा मोदी सरकारचा इरादा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

    मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबर वक्फ कायदा रद्द करणे, 1991 च्या प्रार्थना स्थळे कायद्यात बदल करणे तसेच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करणे अशी आव्हाने देखील मोदी सरकार पेलणार आहे. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांच्यासारखे कसलेले वकील आपल्या हाताशी असणे आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर लोकसभेत करून घेणे हा मोदी सरकारचा इरादा आहे. यासाठीच भाजपने उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीत उतरविले आहे.

    Nomination for Ujjwal Nikam from North Central Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक