भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू असून या अहवालाचा विचार करत आहेत.Nomadic tribes in the country will be given reservation outside OBC – Ramdas recalled
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकार भटक्या जमातींना (NT) आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.सरकार भटक्या जमातींच्या दुर्दशेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआर इदाते समितीने सादर केलेल्या अहवालाचा विचार करत आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे भटक्या जमाती म्हणजेच भारतातील ‘घुमंतू’ समुदायाला लवकरच इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
“समीर वानखेडे हे बाबासाहेबांचे अनुयायी , दलीत अधिकाऱ्यावर होतोय अन्याय ” – रामदास आठवले
सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस
“बालकिशन रंके समितीने देशभरात सर्वेक्षण केले आहे . त्यांनी भटक्या जमातींच्या अवस्थेवर प्रकाश टाकला असून त्यांची मुलं शिक्षणापासून कशी वंचित राहिली आहेत याचा समितीने सर्वेक्षणात उल्लेख केला आहे. तसेच भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू असून या अहवालाचा विचार करत आहेत.
आठवले म्हणाले की , भटक्या जमातींना ओबीसींच्या बाहेर आरक्षण देता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. समितीने सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे, परंतु मंत्रालय अद्याप अहवालाचा अभ्यास करत आहे आणि अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही,” असे आठवले म्हणाले.
Nomadic tribes in the country will be given reservation outside OBC – Ramdas recalled
महत्त्वाच्या बातम्या
- दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, पीएम मोदी-अमित शाह यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
- Aryan Khan Case : सॅम डिसुझाला झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- मोठी बातमी : दिवाळीला फेडरल सुट्टी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात विधेयक सादर
- दिवाळी साजरी करण्यामागील महत्वाच्या घटना आणि हेतू