प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात एकाही महिलेला स्थान दिले नसल्याबद्दल त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच सवाल केला आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करून त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. No woman in cabinet expansion in maharashtra, supriya sule targets PM Narendra Modi, but there were only 3 women in Thackeray pawar cabinet
– पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल, अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे.
– राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे.
मात्र, हे शरसंधान साधताना आधीच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमध्ये किती महिला मंत्री होत्या?, हे मात्र त्या सोयीस्कररित्या विसरल्याचे दिसत आहे. ज्या कोणी महिला मंत्री होत्या, त्या काँग्रेसकडून होत्या. यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या कॅबिनेट मंत्री होत्या, तर खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या राष्ट्रवादीकडून राज्यमंत्री होत्या. म्हणजे महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमध्येही महिला मंत्र्यांना तसे दुय्यमच स्थान होते. मात्र, असे असताना देखील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारावरून सुप्रिया सुळे यांनी महिला मंत्री का नाही हा महिला शक्तीवर अन्याय असल्याचे शरसंधान साधून आपली साळसूद भूमिका एक प्रकारे जाहीर केली आहे!!
No woman in cabinet expansion in maharashtra, supriya sule targets PM Narendra Modi, but there were only 3 women in Thackeray pawar cabinet
महत्वाच्या बातम्या
- वीज दुरुस्ती विधेयक 2022 लोकसभेत सादर : केजरीवाल म्हणाले- हे धोकादायक, संसदीय समितीकडे पाठवले
- लवासा बेकायदा बांधकाम : पवारांवरील आरोपांची दखल घेत सुप्रीम कोर्टाची नोटीस!!; 6 आठवड्यांत उत्तर द्या!!
- Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जिंकली 61 पदके, वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी
- माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयचा छापा, म्हणाले- देशासाठी हा काळा दिवस