पाहिलं गेलं तर नागपूर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे.तरी ही नागपूरमध्ये १४ टक्के लोकांनी अद्याप लस घेतलेली नसल्याचं कळतंय.No Vaccine No Salary: New order of Nagpur Municipal Corporation for its employees
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.जास्तीत जास्त लसीकरण व्हावं म्हणून सरकारने ‘हर घर दस्तक’ तसेच ‘कवच कुंडल’ अशा पद्धतीनं लसीकरणाचा वेग वाढवला आहे.दरम्यान काही शहरांमध्ये अजूनही काही लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाहीये.
पाहिलं गेलं तर नागपूर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे.तरीही नागपूरमध्ये १४ टक्के लोकांनी अद्याप लस घेतलेली नसल्याचं कळतंय.ज्यांनी लस घेतलेली नाही त्या लोकांमध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.यावर उपाय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला नसेल त्यांना पगार मिळणार नाही असे आदेश नागपूर महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त राम जोशी यांनी जारी केला आहे.
नागपूर शहरात १९ लाखांपैकी १७ लाख लोकांनीच लसीचा डोस घेतला असून १ लाख ९७ हजार लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचं कळतंय. त्यामुळे लसीकरणाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी महापालिकेने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.यावेळी नागपूर मनपा ने निर्णय घेतला आहे की , १ डिसेंबर पासून शहरात मोफत लस देण्यात येणार नाही.
तसेच सोबतच सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालय, तत्सम संस्थांध्ये कार्यरत कर्मचारी यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा किंवा किमान पहिला डोस घेतला असेल तरच पगार दिला जाणार आहे.‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश जारी केले आहेत.नागपूरात लसीकरण मोहिमेला गति देण्यासाठी मनपा हेआदेश जारी करण्यात आले आहेत.