नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० ते ७० अशी आढळून आली.’No Vaccine No Entry’ in Nagar District; Order issued by the Collector
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० ते ७० अशी आढळून आली.यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालये व दुकानामध्ये जाण्यासाठी नो व्हॉक्सिन नो एंट्री असा आदेश काढला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क सॅनिटाझर अनिवार्य केले आहे.
या ठिकाणी नो व्हॉक्सिन नो एंट्री
सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना-कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी कोविड डोसच्या प्रमाणपत्राशिवाय आता प्रवेश मिळणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नेमके काय सांगितले
१)प्रत्येकांची किमान प्रतिबंधात्मक लसीकरणाचा एक डोस घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे.
२) निमयांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
‘No Vaccine No Entry’ in Nagar District; Order issued by the Collector
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
- दुबईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईन सक्तीचे ; ओमायक्रॉनच्या पार्श्भूमीवर राज्य सरकारचा कठोर नियम
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करणार ; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शपथनाम्यातील वचनाला हरताळ
- अणुबॉम्बचा स्फोट, उल्कापातामुळे समुद्रामध्ये प्रलय; नॉस्ट्राडेमसची २०२२ साठी धक्कादायक भविष्यवाणी