• Download App
    No Thackeray in mumbai, No Pawar in Maharashtra, BJP breaks them both ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!

    Thackeray

    नाशिक : ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा आणि अजितदादा गेल्यानंतर भाजपच्याच हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!, असेच राजकीय चित्र मुंबई आणि बारामतीतल्या आजच्या घडामोडींमधून समोर आले.No Thackeray in mumbai, No Pawar in Maharashtra, BJP breaks them both

    – मुंबईत रितू तावडे महापौर

    मुंबईत भाजपने ठाकरेंना वगळून मराठीचा ठसा उमटवत रितू तावडे यांना महापौर केले, शिवसेनेच्या संजय घाडींना उपमहापौर केले. महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे मराठी माणसांनाच दिली. त्यामुळे मुंबईत ठाकरे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी माणूस म्हणजे ठाकरे हे समीकरण भाजपने मोडून काढले. ठाकरे बंधू एकत्र आले, तरी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. त्यामुळे ते मुंबईत आपला महापौर बसवू शकले नाहीत. पण म्हणून मराठी माणसाला मुंबईचे महापौर पद मिळायचे राहिले नाही. भाजपने मराठी माणसालाच मुंबईचे महापौर पद दिले आणि मुंबईतला मराठीचा ठसा पुसू दिला नाही.



    – बारामतीतल्या घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”

    दुसरीकडे अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या थेट ताब्यात जाण्यापासून भाजपनेच वाचविली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री कडून शरद पवार यांच्या मनसूब्यांवर पाणी फेरले. त्यांना अजित पवारांच्या एक्झिट नंतर सुद्धा सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवता आले नाही. उलट भाजपनेच सुनेत्रा पवारांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रस्थापित केले. त्यामुळे शरद पवारांनाच गोविंद बाग निवासस्थान सोडून अजित पवारांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीमध्ये जावे लागले. सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भेटीगाठी घ्यायला लागल्या. बारामतीतल्या सगळ्या घडामोडींपासून सुप्रिया सुळे यांना “दूर” ठेवावे लागले. हे सगळे राजकारण केवळ भाजपने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून घडवून आणले.

    – मुंबई ठाकरेंचा विरोधी पक्षनेता

    आता मुंबईत ठाकरे बंधू एकत्र राहिले तरी ते मुंबई महापालिकेत फार तर मराठी विरोधी पक्ष नेता देऊ शकतील आणि शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस विनीकरणाची वाट पाहत राहील. शरद पवार हे अजित पवार यांच्या स्मारकासाठी मार्गदर्शन करत राहतील. त्यापलीकडे फक्त माध्यमांच्या बातम्यांमध्ये राहण्याखेरीज ठाकरे आणि पवार दोघेही खऱ्या अर्थाने राजकारण करून भाजपला नामोहरम करू शकणार नाहीत.

    No Thackeray in mumbai, No Pawar in Maharashtra, BJP breaks them both

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर; उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, अतुल सावेंनी केली घोषणा

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी