राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढणार असल्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. आघाडी सरकार व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.No reservation for Maratha community due to state government’s denial, Vinayak Mete warns of statewide Maratha rallies
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढणार असल्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.
आघाडी सरकार व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ते म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही.
या निर्णयाचा मोठा परिणाम मराठा समाजातील पुढील पिढीवर होणार आहे. त्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. त्यामुळे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन २०१६ सालाप्रमाणे मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात ७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ८ तारखेला निदर्शने केली जाणार आहेत, तर १५ तारखेला लॉकडाऊन संपले तर पुढील काही दिवसांत पहिला मोर्चा बीडमध्ये काढला जाणार आहे
No reservation for Maratha community due to state government’s denial, Vinayak Mete warns of statewide Maratha rallies