no relief to anil deshmukh : मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयच्या एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाने देशमुख यांच्याविरोधात सीबीआय एफआयआरच्या काही परिच्छेदांना आव्हान देणारी राज्य सरकारची याचिकादेखील फेटाळून लावली. no relief to anil deshmukh bombay hc refuses to quash cbi fir on corruption charge
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयच्या एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाने देशमुख यांच्याविरोधात सीबीआय एफआयआरच्या काही परिच्छेदांना आव्हान देणारी राज्य सरकारची याचिकादेखील फेटाळून लावली.
100 कोटींच्या खंडणीच्या रॅकेटशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहे. या आरोपांमुळे देशमुख यांनी यावर्षी एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
ईडीने गेल्या महिन्यात देशमुख, त्यांचे सहकारी आणि मुंबई व नागपूर येथील अनेक जागांवर छापे टाकले होते. त्यानंतर संचालनालयाने पहिले समन्स बजावले होते. नंतर एजन्सीने त्यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केली. त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सचिव कुंदन शिंदे यांना 6 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या खटल्याखेरीज ईडीला देशमुख यांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या काही शेल कंपन्यांशी संबंधांबद्दलही प्रश्न विचारायचे आहेत. या कंपन्यांचा वापर पैशांची हेराफेरी करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बनावट कंपन्यांमधून पैशांची हेराफेरी
ईडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपनी आहेत. या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती. पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण असल्याचे आढळून आले नाही. याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता. यातील चार कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते. या कंपन्यांत मी संचालक होतो याची मला माहिती ही नव्हती.
no relief to anil deshmukh bombay hc refuses to quash cbi fir on corruption charge
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या वाढदिवशी लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा, 19.96 लाख रुपयांच्या थकीत कर्जाची परतफेड
- Pegasus Controversy : अॅम्नेस्टी इंटरनॅशनला मोठ खुलासा, लिस्टमधील नावं टारगेट नव्हती, माध्यमांनी रंगवल्या कहाण्या
- Parliament Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये दोन वेळा कार्यवाही स्थगित, विधेयकांवर चर्चेस अडथळे
- दक्षिण गोव्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत यांच्या कारला अपघात, सुदैवाने दुखापत नाही
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, 6 पोलिसांसह एकूण 7 जणांविरुद्ध FIR