विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीत जरी महायुतीचे घटक उतरले असले तरी प्रत्यक्षात ते निवडणुकीनंतरचे समीकरण जुळवायला उतावीळ झाले आहेत, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे मात्र त्यांना जवळ घेण्यापेक्षा दूर लोटायला अधीर झाले आहेत. नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वक्तव्यांमधूनच ही समान बाब समोर आली. No reconciliation between pawar
निवडणुकीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात. त्यांच्यात आतून काहीतरी सुरू आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांचा दावा फेटाळला. त्याला दोन दिवस उलटून गेले.
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
पण दिलीप वळसे पाटलांनी देखील वेगळ्या भाषेत नवाब मलिकांचाच दावा पुढे केला. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जरी महायुती म्हणून लढत असली तरी प्रत्यक्षात कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात, त्यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. आज जरी महायुती आणि महाविकास आघाडी असे मिळून सहा पक्ष एकमेकांसमोर असले, तरी निवडणुकीनंतर वेगळे समीकरण जुळू शकते, असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केला.
मात्र, सुप्रिया सुळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांना पुन्हा एकदा बरोबर घेण्याचा दावा फेटाळला. अजित पवार जोपर्यंत भाजप बरोबर आहेत, तोपर्यंत आमचे आणि त्यांचे जुळणे शक्य नाही. कारण आमच्या विचारधाराच मूळात वेगळ्या आहेत, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
सुप्रिया सुळे यांच्या उत्तरातून अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता मावळली. यामध्ये विचारधारेपेक्षा सरळ सरळ कौटुंबिक संघर्ष आणि पक्षावरचे वर्चस्व हा मुद्दा जास्त अधोरेखित झाला. अजित पवार जर पुन्हा शरद पवारांबरोबर जुळवून घेऊन राष्ट्रवादीत आले किंवा दोन राष्ट्रवादींची आघाडी झाली, तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या सुप्रिया सुळे यांच्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो, याची भीती सुप्रिया सुळेंना वाटत असल्याने त्यांनी अजित पवारांनी शरद पवार यांच्या फेरजुळणीची शक्यता फेटाळली.
No reconciliation between pawar
महत्वाच्या बातम्या
- Kamala Harris “या निवडणुकीचा निकाल तो नाही,जो…” पराभवानंतर कमला हॅरिसचा समर्थकांना संदेश
- Raj thackeray मला संधी द्या, एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही; अमरावतीतून राजगर्जना!!
- Mahavikas Aghadi : लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसचे नेते कोर्टात; पण महाविकास आघाडी सरकार महिलांना 3000 रुपये देणार!!
- Brampton : ‘ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना होती सर्व माहिती ‘