• Download App
    महायुतीतील समन्वयातूनच सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदारकी; अजितदादांचा निर्वाळा!! No problem in mahayuti over sunetra pawar's rajyasabha candidature

    महायुतीतील समन्वयातूनच सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदारकी; अजितदादांचा निर्वाळा!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतल्या बाकीचे कोणी नेते हजर नव्हते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट करा खुलासा केला. महायुती मधल्या पक्षांच्या नेत्यांच्या समन्वयांमधूनच सुमित्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या असे अजित पवारांनी सांगितले. No problem in mahayuti over sunetra pawar’s rajyasabha candidature

    महाराष्ट्र विधानसभेत एका बाजूला 200 पेक्षा जास्त आमदार आणि दुसऱ्या बाजूला सत्र 70 – 75 आमदार होते. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोधच होणार होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कालच सांगितले होते. त्यांनी देखील महायुती राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला होता, असे अजित दादांनी स्पष्ट केले.



     

    मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती अमोल काळे यांचे निधन झाल्याने त्यांना नाशिकला अस्थिविसर्जनासाठी जायचे होते. त्यामुळे ते सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरायला आले नव्हते. त्यांच्या वर दुःखद प्रसंग आला असताना त्यांना राज्यसभेचा फॉर्म भरायला बोलावणे योग्य वाटले नाही, असा खुलासा अजित पवारांनी केला. छगन भुजबळांच्या नाराजीचे वृत्त देखील अजित पवारांनी फेटाळून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित केली त्यात छगन भुजबळ होते असा खुलासाही त्यांनी केला.

    No problem in mahayuti over sunetra pawar’s rajyasabha candidature

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!