• Download App
    फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग लावलेत तर भाजपकडून "गंभीर दखल"; सेवा कार्यात योगदान द्या No posters, banners allowed for devevndra fadanavis birthday's bash

    फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग लावलेत तर भाजपकडून “गंभीर दखल”; सेवा कार्यात योगदान द्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे. No posters, banners allowed for devevndra fadanavis birthday’s bash

    होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत.



    भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे, असेही मुकुंद कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

    No posters, banners allowed for devevndra fadanavis birthday’s bash

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने म्हटले- कुठेही नमाज पठण करणे धार्मिक अधिकार नाही; सुरक्षा सर्वात आधी

    Iran war effect : पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा स्थगित; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

    Minister Pratap Sarnaik : मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य