• Download App
    हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागावी । No other religion in the world has such tolerance as Hinduism. That is why anyone should get up and say, write and behave about Hindu traditions. An example of this comes from a brand advertisement. It has been commented on without understanding the meaning of Kanyadan Sanskar in Hindu marriage system. The Hindu Janajagruti Samiti has raised valid objections to this and warned Vedant Fashion Ltd.

    हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हे ‘कन्यामान’च; ‘मान्यवर’ ब्रँडने हिंदूंची माफी मागावी

    हिंदू धर्माइतकी सहिष्णूता जगातल्या कोणत्याच धर्मात नाही. त्यामुळेच कोणीही उठावे आणि हिंदू परंपरांबद्दल काहीही बोलावे, लिहावे, वागावे असे चालते. याचेच उदाहरण एका ब्रँडच्या जाहिरातीमधून समोर आले आहे. हिंदू विवाह पद्धतीमधल्या कन्यादान संस्काराचा अर्थ समजून न घेता त्यावर टीप्पणी करण्यात आली आहे. याला हिंदू जनजागृती समितीने मुद्देसूद आक्षेप घेतला आहे. No other religion in the world has such tolerance as Hinduism. That is why anyone should get up and say, write and behave about Hindu traditions. An example of this comes from a brand advertisement. It has been commented on without understanding the meaning of Kanyadan Sanskar in Hindu marriage system. The Hindu Janajagruti Samiti has raised valid objections to this and warned Vedant Fashion Ltd.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. असे असतांना नुकताच ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या कंपनीने ‘मान्यवर’ या प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडची एक जाहिरात प्रसारित केली आहे, त्यामध्ये ‘कन्यादान’ कसे चुकीचे आहे, तसेच ‘दान करायला कन्या वस्तू आहे का’ असे प्रश्‍न उपस्थित करत ‘आता कन्यादान नव्हे, तर कन्यामान’ असा परंपरा बदलण्याचा संदेश दिला आहे.

    हिंदू जनजागृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात हिंदु धर्मातील धार्मिक कृतींचा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार करणारी, धार्मिक कृतींचा अपमान करणारी आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे, असे म्हणत या जाहिरातीचा निषेध केला आहे. हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ हा विधी मुळातच कन्येचा सन्मान करणारा अर्थातच ‘कन्यामान’ आहे. त्यामुळे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ला या कंपनीने ही जाहिरात त्वरित मागे घेऊन हिंदूंची बिनशर्त क्षमायाचना करावी. जोवर असे होत नाही, तोवर ‘हिंदु समाजाने ‘मान्यवर’ ब्रँडवर बहिष्कार घालावा’ असे आम्ही आवाहन करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी कळवले आहे.



    या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ विधी हा एकप्रकारे महिलांचा अपमान असल्याचे दर्शवले आहे. मुळात या विधीद्वारे कन्यादान करताना वराकडून वचन घेतले जाते. कन्या काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, ‘विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा आणि दोघांनी सुखाचा संसार करा.’ त्यावर ‘नातिचरामि’ म्हणत वर म्हणतो, ‘तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.’ इतका श्रेष्ठ असा हा विधी तथाकथित पुरोगामीपणा दाखवत हेतूतः बुद्धीभेद करून हिंदु धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

    हिंदु धर्मात स्त्रियांचा जेवढा सन्मान दिला आहे, तो जगभरातील कोणत्याही धर्मात दिला गेलेला नाही; किंबहुना काही प्रस्थापित धर्मांत तर स्त्रीला मानव म्हणूनही वागणूक दिली जात नाही. हिंदु धर्मात स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. पत्नीशिवाय धार्मिक विधींना आरंभच होऊ शकत नाही. तरी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सद्यस्थितीत ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’, ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’ असे मानणारी विचारसरणी अस्तित्त्वात आहे, याबाबत कोणी जाहिरात तर सोडा, साधा निषेध करायलाही पुढे येत नाहीत. सामाजिक स्वास्थ टिकून रहावे, म्हणून ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ कंपनीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि जाहिरातींसाठीही ‘सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करावे, अशी मागणीही केंद्र सरकारकडे करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

    No other religion in the world has such tolerance as Hinduism. That is why anyone should get up and say, write and behave about Hindu traditions. An example of this comes from a brand advertisement. It has been commented on without understanding the meaning of Kanyadan Sanskar in Hindu marriage system. The Hindu Janajagruti Samiti has raised valid objections to this and warned Vedant Fashion Ltd.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस