वृत्तसंस्था
पिंपरी चिंचवड : हा नबाब मलिक कोणाच्या बापाला घाबरत नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो लोकांना खोट्या ड्रग्स केसेस मध्ये अडकवत आहे. समीर वानखेडे सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. समीर वानखेडेने माझ्या जावयाला अटक केली.No one’s father is afraid, Sameer Wankhede will not live without being imprisoned
तो वर्षभरात त्याची नोकरी गमावेल आणि मी त्याला तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील दिली.
समीर वानखेडे सध्या बॉलिवूड सेलिब्रिटीच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा बॉलिवूडचे सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते तेव्हा समीर वानखेडे आणि त्यांची बहीण मालदीवमध्ये वसुली कांडात अडकलेले आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा नबाब मलिक यांनी केला.
त्यावेळी संतप्त होऊन नबाब मलिक म्हणाले, की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने माझ्या जावयाला अटक केली आणि आता ते माझा काही संबंध नाही म्हणतात. पण मी समीर वानखेडेला सोडणार नाही. त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही.
समीर वानखेडे त्यांचा पोपट आहे. पण त्याचा कोण बाप वर बसलाय?, ते त्याने सांगावे. आम्ही त्याच्या बापाला घाबरत नाही, अशी धमकीवजा भाषा नवाब मलिक यांनी यावेळी वापरली.
राष्ट्रवादीचे आणखी एक नेते, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील मेळाव्यात अशाच प्रकारे नुकताच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचा बाप काढला होता. आम्ही ईडीच्या बापाला घाबरत नाही. काय करायचे ते करून घ्या. त्यांना आम्ही हिसका दाखवू. किरीट सोमय्यालाही हिसका दाखवला असता पण अजित पवार म्हणाले म्हणून गप्प बसलो, असे शशिकांत शिंदे म्हणाले होते.
येत्या चार पाच महिन्यात महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा पिंपरी-चिंचवडचा दौरा नुकताच झाला आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे दोन आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना टार्गेट केले होते. नवाब मलिक यांनी मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट करून घेतले आहे.
No one’s father is afraid, Sameer Wankhede will not live without being imprisoned
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य
- औरंगाबादमध्ये हुतात्मा पोलिसांना अभिवादन; शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात कार्यक्रम
- Nepal Floods : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, 77 जण ठार, अनेक जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू
- धर्मांतरप्रकरणी अडकलेल्या IAS इफ्तिखरुद्दीन यांना निलंबित करणार योगी सरकार, एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे