• Download App
    Devendra Fadnavis वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही;

    Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही; नीलेश चव्हाणच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील नीलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही.Devendra Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केली आहे. नेपाळला पळून जाण्याची तयारी होती परंतु पोलिसांनी बॉर्डरवरच त्याला अटक केली आहे. योग्य प्रकारचे इंटेलिजेंस प्राप्त करून हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की या प्रकरणात जेवढे कोणी लोक असतील कोणालाही सोडले जाणार नाही, कुठलीही हयगय केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशी शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे.



    लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांना लाभ मिळणार नाही

    लाडकी बहीण योजनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळात याचा लाभ घेतला आहे हे माहीत असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात चौकशी करत आहोत. आम्हाला जे कोणी लोक असे आढळून येत आहेत आम्ही त्यांना कमी करत आहोत. अजून याचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देऊ.

    आयजी जालिंदर सुपेकर प्रकरणी तपासात दबाव आणू नये

    आयजी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी मी सांगितले आहे. आणि दुसरे कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासात दबाव आणू नये किंवा या तपासात गडबड करू नये या दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले आहेत.

    No one will be spared in Vaishnavi Hagwane case; CM’s reaction after Nilesh Chavan’s arrest

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!