• Download App
    विनामास्क कोणीही घराबाहेर पडता कामा नये ; किशोरी पेडणेकर यांचे आवाहनNo one should go out of the house without a mask; Appeal of Kishori Pednekar

    विनामास्क कोणीही घराबाहेर पडता कामा नये ; किशोरी पेडणेकर यांचे आवाहन

    मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे.No one should go out of the house without a mask; Appeal of Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना तसेच नियम लागू करण्यात आले आहेत.दरम्यान मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे.

    31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.



    यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की , मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र काळजी घ्यावी लागेल. विनामास्क घराबाहेर पडता कामा नये,तसेच मुंबईत बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

    पुढे पेडणेकर यांनी मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे.

    No one should go out of the house without a mask; Appeal of Kishori Pednekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी