विशेष प्रतिनिधी
मुबंई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध वारंवार आरोप केले होते. या दोन्ही कुटूंबियांमध्ये मध्यंतरी ट्विटर वॉर सुरू होतो. याविरूद्ध वानखेडे कुटुंबीयांनी न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. समीर वानखेडे यांचे वडील यांनी ही तक्रार दाखल करत मानहानीचा दावा केला होता.
no more allegations on sameer wanakhede ; nawab malik
त्यानंतर कोर्टाकडून नवाब मलिक यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही जे आरोप केले आहेत ते वैयक्तिक पातळीवर केलेले आहेत की राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून करत आहात? जर तुम्ही वैयक्तिक पातळीवर हे आरोप करत असणार तर तुम्हाला कोर्टात येऊन माफी मागावी लागेल. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी हे आरोप राजकीय पक्षाचे प्रवक्ते हे म्हणून केले आहेत असे सांगितले होते.
त्यानंतर प्रतिज्ञा पत्राद्वारे इथून पुढे असे कोणतेही आरोप केले जाणार नाहीत, असे नवाब मलिक यांनी मान्य केले होते ल. पण तरीदेखील त्यांनी आपले आरोप करण्याचे सत्र चालूच ठेवले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. यावेळी नवाब मलिक यांनी माफी मागून यापुढे कोणत्याही आरोप करणार नाही असे सांगितले आहे.
no more allegations on sameer wanakhede ; nawab malik
महत्त्वाच्या बातम्या
- विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!
- पांढर्या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल
- आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय
- पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी
- पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले