- मुंबईत शिवसेना नगरसेविका संध्या दोशी डॉक्टरांवरच अरेरावी करत असल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- त्या बीएमसी एज्युकेशन कमिटीच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाचा महाभयंकर संकटामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांवर सध्या प्रचंड ताण आहे. पण त्यांची ही परिस्थिती समजून न घेता मुंबईत शिवसेनेची एक नगरसेविका डॉक्टारांवरच अरेरावी करत असल्याचा एक व्हीडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.No masks, abuses and ruckus: How a Shiv Sena corporator abuses power to threaten doctors on duty
मुंबईच्या कांदिवलीमधील भगवती रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी येथील डॉक्टरांशी प्रचंड वाद घातल्याचं समोर आलं आहे. यावेळी त्या भगवती रुग्णालयातील डॉक्टरांशी हुज्जत घालत आहेत.
‘हे पाहा हॉस्पिटलमध्ये ना मी असे दहा 10 डॉक्टर उभे करु शकते. त्यांची भाषा माझ्या नातेवाईंकासोबत अतिशय चुकीची होती. तो तमाशा झाला म्हणून मी इथे आले आहे. जे डॉक्टर बसले आहेत ना त्यांना शिस्त शिकवा आधी ही पेशंट पाहा.. तिची अवस्था बघा काय आहे. डॉक्टर असतील तर त्यांच्या घरचे.’
संध्या दोशींनी फोन लावला आणि त्यानंतर फोनवर म्हणतात. ‘मॅडम तुम्ही कॅज्युएलटी वॉर्डमध्ये या. हे कोण डॉक्टर आहेत बघा जरा जे मला शहाणपणा शिकवत आहे बघा.’ अशी अरेरावीची भाषा करत आहेत.
यानंतर येथील डॉक्टरांनी मिळून सर्व हकीकत सांगितली ते म्हणाले की इथे केवळ 2 डॉक्टर आहेत आणि आम्ही अहोरात्र झटत आहोत. अशातच हा प्रकार खुप मानसिक तान देणारा आहे. मॅडम तुम्ही प्लीज डॉक्टर अरेंज करा आम्ही कुणीही इथे काम करणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया निवासी डॉक्टरांनी दिली होती.
डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता नगरसेविका संध्या दोशी यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘त्या ठिकाणी जाण्याचा माझा उद्देश एवढाच होता की, पेशंटला अॅडमिट करुन घेणं. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामागे माझा काहीही उद्देश नव्हता. जर माझ्या बोलण्यातून डॉक्टर किंवा स्टाफ यांचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.’ असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
बीएमसी निवडणुकीपूर्वी पक्ष बदलण्यापूर्वी संध्या दोशी यांनी दोन वेळा राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले.
2016 मध्ये दोशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. सध्या त्या मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि प्रभाग -18 नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.
No masks, abuses and ruckus: How a Shiv Sena corporator abuses power to threaten doctors on duty