• Download App
    राज्यात लॉकडाऊन नाहीच, अफवा पसरवू नका; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा कडक इशारा No lockdown in the state, don't spread rumors; Health Minister Rajesh Tope's stern warning

    राज्यात लॉकडाऊन नाहीच, अफवा पसरवू नका; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा कडक इशारा

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद – राज्यात लॉकडाऊन नाहीच, अफवा पसरवू नका, असा कडक इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला. No lockdown in the state, don’t spread rumors; Health Minister Rajesh Tope’s stern warning

    राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ते आज औरंगाबादमध्ये बोलत होते.



    राजेश टोपे यांनी संगितले की, राज्यात दोन दिवसात रुग्णांचे आकडे दुप्पट होत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रोनचा प्रसार वाढू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही. पण निर्बंध कडक करणार आहे.

    आपण एस जीनच्या किट्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ओमिक्रोन आणि डेल्टाचे किती रुग्ण कोणते आहेत आणि याचे प्रमाण कळेल. त्या आधारे योग्य ते उपचार करता येतील.

    राजेश टोपे म्हणाले. राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये. ७०० मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन लागेल, असे टोपे म्हणाले.

    ‘ओमिक्रोनचा जास्त संसर्ग आहे हे खरंय मात्र निर्बंध सध्या लावले आहेत ते वाढवावे सुद्धा लागतील याबाबत बैठक झाली आहे. पुढच्या आठवड्यात सुद्धा बैठक आहे. लॉकडाऊनचा अजिबात विषय नाही कारण मुख्यमंत्र्यांसोबत २ तासांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली नाही.,मात्र निर्बंध वाढवणार आहे.

    लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपण हे पाहिलं, जान है तो जहान है मान्य, कठोर निर्णय घेऊच. मात्र निर्बंध हे पाहिलं पाऊल आहे, एक नक्की आज आपण निर्बंध लावले आहेत, पुढं कठोर कारवाई करू. पुढं सिनेमा हॉल, हॉटेल्स, स्कूल कॉलेजना अजून हात लावला नाही. मात्र पुढं निर्बंध लागू शकतात, सध्या लसीकरणाबाबत विचार करत आहोत. ३ तारखेपासून अजून काही नियोजन सुरु आहे.

    No lockdown in the state, don’t spread rumors; Health Minister Rajesh Tope’s stern warning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!