• Download App
    पुण्यात कठोर निर्बंध लागू; सायंकाळी ६.०० ते ६.०० संचारबंदी, बार, हॉटेल, रेस्टॉरंट ७ दिवस बंद; पीएमपीएल सेवा बंद; मंडई, मार्केट यार्ड सुरू; सोशल डिस्टन्सिंग आवश्यक | NO lockdown, but Bars Hotels And Restaurants In Pune Will Be Closed For Seven Days in pune

    पुण्यात कठोर निर्बंध लागू; सायंकाळी ६.०० ते ६.०० संचारबंदी, बार, हॉटेल, रेस्टॉरंट ७ दिवस बंद; पीएमपीएल सेवा बंद; मंडई, मार्केट यार्ड सुरू; सोशल डिस्टन्सिंग आवश्यक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कोरोना वाढता प्रकोप लक्षात घेऊन पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर याची माहिती दिली. पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. NO lockdown, but Bars Hotels And Restaurants In Pune Will Be Closed For Seven Days in pune

    तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस कोरोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.



     

    तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

    मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालये ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता पुढील आठवडयात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

    NO lockdown, but Bars Hotels And Restaurants In Pune Will Be Closed For Seven Days in pune

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस