प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची लाट रोखण्यात अपयश, कोरोना हॉस्पिटल उभारणीमध्ये भ्रष्टाचार तसेच अपयश, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश, बेरोजगारी दर कमी करण्यात अपयश… अशी सगळीकडे महाराष्ट्राची मोठी घसरगुंडी सुरू आहे, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे काढले. अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. No – law and order and unemployment everywhere in Maharashtra
एकापाठोपाठ एक मुद्दे उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारच्या दोन वर्षातल्या अपयशाचा मोठा पाढा वाचला. महाविकास आघाडीच्या राजवटीत कोरोना फक्त मंदिरांमध्ये किंवा सर्वसामान्यांना होतो. सत्ताधारी पक्षांच्या मेळाव्यांमध्ये, त्यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये कोरोना होत नाही, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या भाषणाचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर हँडलवर शेअर केले आहेत. ते असे :
महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी दर
पीएलएफएस अहवाल महाराष्ट्र : 22.6 टक्के, झारखंड : 19.8 टक्के केरळ : 18.9 टक्के जम्मू-काश्मीर : 17.4 टक्के ओरिसा : 16.5 टक्के तेलंगणा : 15.4 टक्के अशा राज्यांसोबत महाराष्ट्राची तुलना यापूर्वी कधीही होत नसे.
- 2020-21 या वर्षांत सर्वाधिक आमदार निधी कुणाला? राष्ट्रवादी काँग्रेस : 2,25,461 कोटी रुपये, काँग्रेस : 1,01,766 कोटी रुपये शिवसेना : 54,343 कोटी रुपये
- मुंबई महापालिकेतील कर्मचारी स्वत:च्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या काढतात आणि कोट्यावधींची कंत्राटे घेतात. हा बरबटलेला कारभार आहे. कोविडचे कारण देत ११७ भ्रष्ट अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने कामावर घेतले
- पीएम केअर्सला नावे ठेवणार्यांनी काय केले? पीएम केअर्समध्ये प्राप्त निधी : 3076 कोटी (आर्थिक वर्ष – 2019-20) पीएम केअर्समधून मंजूर निधी : 3100 कोटी (यातील 1000 कोटी राज्यांना) सीएम रिलिफ फंड : 799 कोटी रूपये सीएम फंडातून दिले : 192 कोटी रूपये (24 टक्के)
- 2021 मधील 6 घटना : 75 हून अधिक मृत्यू 9 जानेवारी 2021 : भंडारा (10 बालकांचा मृत्यू) 11 मार्च 2021 : 11 मृत्यू 21 एप्रिल 2021 : नाशिक ऑक्सिजन गळती (24 मृत्यू) 23 एप्रिल 2021 : विरार आयसीयू आग (15 मृत्यू) 28 एप्रिल 2021 : मुंब्रा आगीत (4 मृत्यू) 6 नोव्हेंबर 2021 : नगर 11 मृत्यू
- एप्रिल 2020 : 40,671 मृत्यू एप्रिल 2021 : 84,262 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 14,164) मे 2020 : 52,596 मृत्यू मे 2021 : 1,22,084 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 26,031) जून 2020 : 68,852 मृत्यू जून 2021 : 88,812 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 27,101) :
- भ्रष्टाचाराचा कळस – 18 रुपयांचा मास्क 370 रुपयांत खरेदी – 400 रुपयांची पीपीई कीट 2000 रुपयांत – 5 लाखांचे व्हेंटिलेटर 18 लाखांत – कोविड सेंटर निर्मितीत गाद्या, पंखे, औषधी खरेदीत इतका भ्रष्टाचार की विचारता सोय नाही – नवीन वस्तु खरेदीच्या किंमतीपेक्षा भाडे अधिककोरोना कुठे जात नाही?
- नेत्यांकडील लग्नात – सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनांमध्ये – काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये :
- कोरोना कुठे होतो? – मंदिरात – मंत्रिमंडळ बैठकीत – मंत्रालयात – अधिवेशनात – लॉकडाऊन लावताना – पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी न करण्यासाठी कोरोना – शेतकर्यांना मदत न करण्यासाठी कोरोना – कोणत्याही घटकाला मदत नाही, कारण कोरोना – विकासाच्या प्रत्येक कामात कोरोना…!!
No – law and order and unemployment everywhere in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब मध्ये भाजप – कॅप्टन अमरिंदरसिंग – सुखदेव सिंह धिंडसा यांच्या त्रिपक्षीय युतीचा समान जाहीरनामा
- मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका
- WATCH : तरुण स्पोर्ट बाईकऐवजी चक्क घोड्यावर स्वार पेट्रोलचा परवडत नाही, वडिलांकडून मुलाला घोडा
- Chandigarh MNC Election Results : चंदिगड महापालिकेत ‘आप’ची बल्ले बल्ले, पहिल्यांदाच १४ वॉर्ड जिंकले, भाजपला १२ जागा, काँग्रेसकडे ८, तर अकाली दलाकडे १ जागा