• Download App
    शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत लगेच निर्णय नको; सुप्रीम कोर्टाचेे निवडणूक आयोगाला आदेश; दोन्ही गटांचे युक्तिवाद "असे"!! No immediate decision on Shiv Sena party symbol; Supreme Court order to Election Commission

    शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत लगेच निर्णय नको; सुप्रीम कोर्टाचेे निवडणूक आयोगाला आदेश; दोन्ही गटांचे युक्तिवाद “असे”!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच, आमदारांच्या अपात्रतेसह सर्व प्रलंबित याचिकांवर पुढील सुनावणी 8 ऑगस्टला होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे की नाही ते सोमवारी होणा-या सुनावणीत ठरणार आहे. No immediate decision on Shiv Sena party symbol; Supreme Court order to Election Commission

    दोन्ही गटांच्या वकिलांचे युक्तिवाद असे

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी बाजू मांडली. सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना विचारले की, हा मुद्दा राजकीय पक्षाशी संबंधित आहे. आपण निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यापासून रोखू शकत का, असा प्रश्न केला.

    यावर सिब्बल यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्षाचे सदस्य मानत नसल्याचे सांगितले. सगळे आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगासमोर कोणता दावा करणार? असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला. तर, निवडणूक आयोगाने पक्षाचे आमदार नसणे आणि पक्षाचे सदस्य असणे यात फरक असल्याचे, अॅड. दातार म्हणाले. निवडणूक आयोगाला दहावी सूची लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था असल्याचेही दातार यावेळी म्हणाले.

    शिंदे गटाचे वकील हरीश साळवे म्हणाले की, आम्ही अपात्र ठरलो तरी पक्षाचे सदस्य आहोत. त्यामुळे पक्षावरील दावा आमचा कायम असल्याचे, त्यांनी म्हटले.

    या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको , अशी सूचना निवडणूक आयोगाला केली.

    त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या वकिलांना आपले सगळे युक्तिवाद लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत

    No immediate decision on Shiv Sena party symbol; Supreme Court order to Election Commission

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!