Friday, 9 May 2025
  • Download App
    Corona Update : सोळा शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, कोरोनामुक्त अधिक ; राज्यातील दिलासादायक चित्र।No deaths in 16 cities and districts due to Corona ; The Updates of state

    Corona Update : सोळा शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, कोरोनामुक्त अधिक ; राज्यातील दिलासादायक चित्र

    Corona Cases In India Today 2.57 lakh New cases Found In 24 Hours See Updates

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या, मृत्यूचे कमी होत चाललेले प्रमाण पाहता राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधाचा चांगला परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी राज्यात 361 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे 16 शहरे आणि जिल्ह्यात कोरोनामुळं एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.  No deaths in 16 cities and districts due to Corona ; The Updates of state


    राज्यात अनेक कोरोना रुग्ण बरे, २९ हजारजण आजार मुक्त ; २४ तासांत ५९४ जणांचा मृत्यू


    कोरोनाचा एकही बळी नाही

    गोंदिया, बुलडाणा, हिंगोली, जालना, धुळे जिल्हा, औरंगाबाद शहर, अकोला शहर, पिंपरी चिंचवड शहर, धुळे शहर, मालेगाव पालिका, वसई विरार शहर, मीरा भायंदर शहर, भिवंडी निजामपूर शहर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे शहरात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. तर भंडारा, नांदेड शहर, लातूर शहर, सोलापूर शहर, औरंगाबाद जिल्हा, नागपूर जिल्हा, जळगाव शहरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

    आकडे बोलतात..

    • रुग्णांना डिस्चार्ज : 42,320
    • नवीन रुग्ण : 22,122
    • मृत्यू : 361
    • एकूण  ॲक्टिव्ह रुग्ण : 3,24,580
    • एकूण बरे : 51,82,592
    • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.51 टक्के
    • मृत्यूदर : 1.59 टक्के
    • प्रयोगशाळा नमुने : 32,77,290
    • नमुने पॉझिटिव्ह : 56,02,19 (16.83 टक्के) व्यक्ती – होम क्वारंटाईन : 27,29,301
    • संस्थात्मक क्वारंटाईन : 24,932 

    मुंबई, पुण्यातील आकडे

    मुंबई :  कोरोनाबाधित रुग्ण : 1,057,  किती बरे : 1312, रिकव्हरी रेट : 93 टक्क्यांवर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी : 334 दिवसांवर

    पुणे : कोरोनाबाधित रुग्ण : 494, किती बरे : 1410.

    No deaths in 16 cities and districts due to Corona ; The Updates of state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhand Bharat : नागपूरच्या झिरो माईल येथे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’सह अनेक प्रकल्पांना मंजुरी

    Finance Commission : वित्त आयोगाकडून महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!