विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करु नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. शिवज्योत वाहण्यासाठी 200 भाविकांना व शिवजयंती तर उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. No crowds for Shiva Jayanti celebrations
शासकीय आदेशात म्हटले आहे की, प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावेत. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
No crowds for Shiva Jayanti celebrations
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस “मुख्यमंत्री”!!; चूक झाली “चुकून” की दत्तामामा मनातलं गेले बोलून??
- प्लास्टिक कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी; १ जुलैपासून देशात अंमलबजावणी
- पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध
- 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नवीन लस कोर्बेवैक्स; लवकरच लसीकरणाचा निर्णय