वृत्तसंस्था
पुणे : गेल्या दीड ते दोन वर्षांच्या इतिहासात प्रथमच आज गुरुवारी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. No corona patient died in Pune on Thursday; Mayor Mohol’s tweet
कोरोनाचा पहिला रुग्ण हा सुमारे दीड वर्षांपूर्वी सिंहगड परिसरात सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत जाऊन मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागला होता. आज गुरुवारी प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण हा मृत्यू पावला नसल्याचे उघड झाले आहे. एकंदरीत हा प्रकार जनतेसाठी दिलासादायक असा आहे. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर असा दिलासा मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. दुसरी लाट ओसरत चालली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण दगावला नाही, हे वृत्त एकूणच पुणेकरांसाठी दिलासादायक असेच आहे.
No corona patient died in Pune on Thursday; Mayor Mohol’s tweet
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिलेली , शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली ‘ ही ‘ प्रतिक्रिया
- आर्यन खानचा जामीन फेटाळला; नबाब मलिक आणि बॉलिवूडकर संतापले
- WHO ने भारतात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचे केले कौतुक , कोव्हॅक्सिनबद्दल देखील केली चर्चा
- Lakhimpur : रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट ची वाट पाहिली ; योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले , पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार