चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील गजानन बापुराव मेंढे (वय ४०) यांचा सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला.No affected person should be deprived of help; Instructions of Guardian Minister Yashomati Thakur
विशेष प्रतिनिधी
अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विवीध भागात नुकसान झाले आहे.मोर्शी, चांदुर बाजार या तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे.दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तत्काळ व सविस्तर पंचनामे करावेत.तसेच एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.
जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी पाऊस पडून नुकसान झाले. चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील गजानन बापुराव मेंढे (वय ४०) यांचा सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल. शासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुढे यशोमाती ठाकूर म्हणाल्या की, शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश सर्व उपविभागीय व तहसील कार्यालयांना देण्यात आले आहेत. तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदतनिधी बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले आहेत.
No affected person should be deprived of help; Instructions of Guardian Minister Yashomati Thakur
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेने साधले काम; मुंबई महापालिकेतले ९ प्रभाग वाढविले; विद्यापीठ विधेयकही विधानसभेत मंजूर; पण राज्यपालांची स्वाक्षरी बाकी!!
- हर्षवर्धन पाटलांची लेक बनली ठाकरे परिवाराची सून, अंकिता आणि निहार ठाकरे यांचा विवाह
- रजपूत आणि दाभोळकर केस देखील सीबीआय कडेच आहेत. त्यांचे काय झाले? राज्य सरकार झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत आहे ; रोहित पवार