विशेष प्रतिनिधी
अमरावती – आंध्र प्रदेशात तीन राजधान्या स्थापन करण्याचा कायदा जगमोहन रेड्डी सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी तीन राजधान्यांचा कायदा मागे घेत असल्याचे निवेदन केले.No 3 capitals in AP now
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. पे. मिश्रा यांनी ॲडव्होकेट जनरलना शपथपत्र सादर करण्याचे सांगितले होते. या कायद्यात विशाखापट्टणला कार्यकारी राजधानी, अमरावतीला राजकीय राजधानी आणि कर्नुलला न्यायिक राजधानी करण्याचा प्रस्ताव होता.
या विधेयकाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गेल्यावर्षी मंजूर झालेल्या या विधेयकाला परत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या एका तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.या विधेयकाला जमीनदार आणि शेतकऱ्यांचा विरोध होता. काही ठिकाणी आंदोलन देखील झाले होते. शेतकऱ्यांनी ४५ दिवसांचा अमरावती ते तिरुपती असा पायी मोर्चा देखील काढला.
No 3 capitals in AP now
महत्त्वाच्या बातम्या
- अॅमेझॉनच्या भारतातील प्रमुखांना ईडीचे समन्स, फ्युचर ग्रुपच्या प्रवर्तकांचीही घेणार झाडाझडती
- अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा
- गुरूनानक जयंतीनिमित्त पाकिस्तानला गेली आणि मुस्लिम धर्म स्वीकारून पाकिस्तान्याशी लग्न करून आली
- त्रिपुरातील “सोंदेश” लागला ममतांना कडू, भाजपला गोड!! पण तो मधूर कुणाला लागलाय?