विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitin Gadkari : लोकसभा निवडणूक विरोधकांपैकी एका नेत्याने मला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, पण मी त्याचे नाव सांगणार नाही, असा गौस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याचवेळी त्यांनी आपण तत्वाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगून पंतप्रधान पदाची ऑफर नाकारली. नितीन गडकरींनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे “इंडी” आघाडीतले अनेक नेते “एक्सपोज” झाले, पण त्यात सर्वाधिक वेगात प्रतिक्रिया आली, ती संजय राऊत यांची. संजय राऊत यांनी चिडून प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे संजय राऊतच का चिडले आणि त्यांनी ताबडतोब प्रतिक्रिया का व्यक्त केली??, असा सवाल तयार झाला.
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला पूर्ण बहुमत मिळणार नाही. त्यामुळे भाजपला पंतप्रधानपदासाठी त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या नेत्याचा विचार करावा लागेल, असा इंडी आघाडीतल्या अनेक नेत्यांचा होरा होता. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाने त्याने नितीन गडकरींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती. पण यात गडकरी प्रेमापेक्षा मोदीविरोध अधिक असल्याचे स्पष्ट दिसत होते. पण गडकरींनी आपले पंतप्रधान होण्याचे ध्येय नाही. आपण तत्वाशी आणि संघटनेशी एकनिष्ठ आहोत, असे सांगून ती ऑफर ठामपणे नाकारली, पण त्यावेळी ही ऑफर नेमके कोणी दिली होती??, ते मात्र त्यांनी सांगितले नाही.
JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
गडकरींनी गौप्यस्फोट केल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. पण गडकरींच्या वक्तव्यावर सगळ्यात आधी प्रतिक्रिया दिली. ती संजय राऊत यांनी. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीत सुरू आहे. ती मोडून काढण्यासाठी गडकरींना ऑफर दिली असेल, तर त्यात चूक काय??, असा सवाल त्यांनी केला. यासाठी त्यांनी बाबू जगजीवन राम यांचे उदाहरण दिले. 1977 मध्ये बाबू जगजीवन राम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन इंदिरा गांधींविरुद्ध बंड केले आणि स्वतःची लोकशाहीवादी काँग्रेस काढली. तसे नितीन गडकरींनी करायला काय हरकत होते??, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यातून संजय राऊत यांचा गडकरी प्रेमापेक्षा मोदीविरोध अधिक उफाळून आलेला दिसला.
पण मूळात नितीन गडकर्यांनी जो गौप्यस्फोट केला, त्यावर सर्वांत आधी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात “गडकरी प्रेम” नेमके कोणाचे आहे?? याविषयी दाट संशय तयार झाला. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शरद पवार यांच्या जवळचे नेते आहेत. शरद पवारांचे “गडकरी प्रेम” सर्वश्रुत आहे, पण त्यात गडकरी प्रेमापेक्षा फडणवीस द्वेष अधिक आहेत हे देखील उघड गुपित आहे. आपल्याला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा कोणी दिला, हे गडकरींनी अजिबात सांगितले नाही. पण म्हणून संबंधित नेत्याचे नाव “एक्स्पोज” व्हायचे राहिले नाही. गडकरींना दिलेली पाठिंब्याची ऑफर हे लबाडा घरचे अवतान होते हे संजय राऊत यांच्या तातडीच्या प्रतिक्रियेने उघड्यावर आले.
Nitin Gadkari statement got Raut angry at secret blast
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदींचा उद्यापासून तीन राज्यांचा दौरा, देशाला मिळणार पहिली वंदे मेट्रो रेल्वे
- JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
- Ladki Bahin Yojna Superhit : बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Onion : सरकारने स्वस्तात विक्री केल्याने बाजारात कांद्याचे भाव घसरले