• Download App
    ‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान! Nitin Gadkari is the most preferred face if there is a hung situation in the upcoming elections Rohit Pawars statement

    ‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान!

    भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वार केला मोठा आरोप, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींबाबतही विधान केलं असून, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली आहे. Nitin Gadkari is the most preferred face if there is a hung situation in the upcoming elections Rohit Pawars statement

    रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘’केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही.’’

    याशिवाय, कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं. शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

    याचबरोबर केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते. असो! महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन! असं म्हणत रोहित पवारांनी टीकात्मक टिप्पणी केली आहे.

    Nitin Gadkari is the most preferred face if there is a hung situation in the upcoming elections Rohit Pawars statement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस