• Download App
    Nitin Gadkari Criticizes Administrative Functioning नितीन गडकरींचे प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट-

    Nitin Gadkari : नितीन गडकरींचे प्रशासकीय कार्यपद्धतीवर बोट- वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले की, आपणही तेच म्हणायचे

    Nitin Gadkari

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Nitin Gadkari वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटले की, आपणही त्याला घोडाच म्हणायचे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सरकार व प्रशासकीय कार्यपद्धतीवर खंत व्यक्त केली. सरकारमध्ये काम करताना जे वरिष्ठ सांगतात तेच करायचे असते. अधिकाऱ्यांवर नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव असतो, असेही ते यावेळी म्हणाले.Nitin Gadkari

    नितीन गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. राजकारणात असलेली त्यांची स्पष्ट व थेट बोलण्याची शैली त्यांना इतर नेत्यांपासून वेगळी करते. ते आपले मत कोणत्याही दडपणाशिवाय थेट मांडतात. त्यातून अनेकदा वादही निर्माण होतात. पण त्यानंतरही गडकरी सातत्याने सरकार व प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर भाष्य करताना दिसून येतात. त्याची प्रचिती नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आली.Nitin Gadkari



    सिनिअर सांगतात तेच खरे मानायचे

    नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात सरकारी व्यवस्था व तेथील उदासिनतेवर भाष्य करत सरकारी कामकाजात पारंपरिक पद्धतीपेक्षा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काम करणे फार आव्हानात्मक असल्याचे नमूद केले. ते यासंबंधी एक उदाहरण देत म्हणाले, एका मलेशियन इंजिनिअरने डिस्टन्स टेक्नॉलॉजी आणली होती. त्यांनी स्टील फायबरमध्ये बीम तयार केले. या बीममुळे दोन पिलरमधील अंतर 120 मीटरपर्यंत वाढवता येत होते. पण हे तंत्रज्ञान आपल्या देशात आणताना व ते मंजूर करून घेताना मला खूप प्रयत्न करावे लागले. सरकारमध्ये एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा कालबाह्य झाली असेल तरीही हे असेच चालवा असे सांगण्यात येते.Nitin Gadkari

    सरकारी व्यवस्थेत एक वेगळाच माहोल असतो. तिथे सिनिअर जे सांगतील तेच खरे मानायचे असते. त्यावर इकडे – तिकडे पाहायचे नसते. वरिष्ठ एखाद्या गाढवाला घोडा म्हणाले तर आपणही त्याला घोडाच म्हणायचे. कारण, बॉस इज ऑलवेज करेक्ट हे सूत्र तिथेही चालते.

    नेत्यांच्या जवळच्यांनाच कंत्राट द्यावे लागतात

    गडकरींनी यावेळी सरकारी कंत्राट पद्धतीवरही भाष्य केले. प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चितच मिळते. पण राजकारण्यांचे जवळचे कंत्राटदार, आर्किटेक्ट यांना काम द्या, त्याला काम देऊ नका, असा दबावही अधिकाऱ्यांवर असतो. त्यातून मार्ग काढत आपण चांगल्या दर्जाचे काम करण्याची गरज असते, असे ते म्हणाले.

    इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरावरून राजकीय मोहीम

    उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन गडकरींनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या विरोधात इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराच्या मुद्यावरून राजकीय मोहीम राबवण्यात आल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले होते, ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सारख्या संस्थांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यासंदर्भात त्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. तुमचे (ऑटोमोबाइल) क्षेत्र ज्या प्रकारे काम करते, त्याप्रकारेच आमचे (राजकीय) क्षेत्रही काम करते. मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी माझ्याविरोधात पैसे देऊन सोशल मीडिया मोहीम राबवली गेली. इथेनॉलच्या वापराबाबत कोणतीही शंका-कुशंका नाही. इथेनॉलचा वापर किफायतशीर आणि प्रदूषणमूक्त आहे.

    आपण 22 लाख कोटी रुपये इंधन आयात करण्यासाठी खर्च करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की, आपला भारत स्वावलंबी झाला पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जर हेच 22 लाख कोटी रुपये वाचणार असतील तर हे आपण करायला नको का? आम्ही मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील शेतकऱ्यांचा 45 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. मक्याला 1200 रुपये क्विंटल दर मिळत होता, आज 2800 रुपये क्विंटलला दर मिळत आहे. आपल्याकडे तांदूळ, गहूदेखील अतिरिक्त होत आहे. त्यापासूनही इथेनॉल तयार होत आहे. त्यामुळे इथेनॉल शेतकऱ्यांच्या फायदेचच आहे, असे ते म्हणाले होते.

    Nitin Gadkari Criticizes Administrative Functioning

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांनी मनोज जरांगेंचा “पार्थ पवार” केला; राजकीय इंधन वाया गेल्यावर कवडी मोलावर आणला!!

    Nitesh Rane : आदित्य ठाकरे उद्या बुरखा घालून मॅच पाहणार, ​​​​​​​नीतेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार

    Nepal : हिंसेचे नेपाळ मॉडेल’ भारतात आणण्याचा काँग्रेसचा हतबल प्रयत्न!