विशेष प्रतिनिधी
हिंगोली : देशात आतापर्यंत तब्बल 80 वेळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडण्याचे पाप काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी हिंगोलीत केला. येथील रामलीला मैदानावर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.Nitin Gadkari attacked Congress, said in Hingoli meeting – Congress committed the sin of breaking the constitution 80 times
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, विरोधकांकडे मते मागण्यासाठी मुद्देच नाहीत. त्यामुळे महायुतीला 400 जागा मिळाल्या तर घटना बदलली जाईल असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. या अपप्रचारातून जनतेच्या मनात विष कालवण्याचे काम काँग्रेसकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यावेळी कन्व्हींन्स करता येत नाही त्यावेळी कन्फ्यूज करणे हाच प्रकार काँग्रेसकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसच्या काळात देशात ग्रामीण रस्ते व सिंचनासाठी प्राधान्य मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या काळात देशाचा विकास झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मागील दहा वर्षात देशात सिंचन, रस्ते, शिक्षण यावर चांगले काम झाले आहे. पाणी हा कळीचा मुद्दा असून मागील दहा वर्षात जलसंवर्धन, सिंचनाच्या कामांवर प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी केंद्र शासनाने विविध योजना हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली. पाणी, रस्ते, दळणवळणाची व्यवस्था असेल तर उद्योग येतील अन बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यानुसार आमचे सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात रस्ते, पाणी, रोजगार, शिक्षण व शेतीमालास भाव मिळाल्यास गावे स्मार्ट होतील त्यानुसारच सरकारचे प्रयत्न असून आता चित्र बदलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात गावे समृध्द होणार असल्याने गावातून शहराकडे कामासाठी गेलेली शेतकऱ्यांची मुले परत गावी येतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे कल्याण करणारी निती हेच आमचे धोरण असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
Nitin Gadkari attacked Congress, said in Hingoli meeting – Congress committed the sin of breaking the constitution 80 times
महत्वाच्या बातम्या
- माता बहिणींच्या मंगळसूत्रांचा हिशेब करून काँग्रेस त्यांचे सोने काँग्रेस घुसखोरांना वाटेल; पंतप्रधान मोदींचा आतापर्यंतचा सर्वांत तिखट हल्ला!!
- अमेरिकेने इस्रायलच्या लष्करी बटालियनवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतल्याने नेतान्याहू संतप्त
- एकाच दिवशी रंगला गीतरामायणातील 56 गीतांचा रंगला सुरेल सोहळा; पुण्याच्या हटके ग्रुपचा अनोखा उपक्रम!!
- “मी राजकारणात कायम राहण्यासाठी आलोय…”; बंगालमधून निवडणूक लढवणाऱ्या युसूफ पठाणचे विधान!