विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांमुळे शिवसेना आणि राणेसमर्थक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांचा बदनामीकारक बॅनर आज ठाण्यात उभारला आणि शिवसैनिक आणि राणे हा वाद पुन्हा उफाळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत सदर बॅनर खाली उतरवला.Nitesh Ranes Defamer banner was finally taken down by the police
एकेकाळी शिवसेनेकडून राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नारायण राणे आणि शिवसेनेमधून आता विस्तव देखील जात नाही. दोन्ही कडची मंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्याचा एकही संधी सोडत नाहीत. त्यातच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांवेळी झालेल्या राड्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्यानंतर आज नितेश राणे यांची बदनामी करणारा बॅनर ठाण्यात झळकल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सदर वादग्रस्त बॅनर लावण्यात आला होता. पोलिसांनी तो वेळेत उतरवल्याने तणाव फळाचा निवळला आहे, असे चित्र आहे.
Nitesh Ranes Defamer banner was finally taken down by the police
महत्त्वाच्या बातम्या
- पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ; सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत होते मोठी उलाढाल
- पाकिस्तानी मौलवीची पाक सर्वोच्च न्यायालयाला जाहीर धमकी, मशीद पडली तर तुमची पदेही सुरक्षित राहणार नाहीत
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर प्रवीण दरेकर म्हणतात- ईश्वरी संकेतही भाजपच्या बाजूने आहेत!