विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.Nitesh Rane
नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी उपरोक्त विधान केले आहे. त्यांच्या हस्ते नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचे प्रकाशन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यात हिंदू वगळता इतर कुणी स्टॉल लावले तर ते उखडून टाकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी घारघरला अशीच भूमिका मांडली.Nitesh Rane
आजूबाजूला जिहादी लोकांची दुकाने होती. तेव्हा मी बोललो. त्यानंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही. मला आताही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रात हिंदूंबाबतच बोलायचे नाही, तर मग पाकिस्तान, इस्लामाबादवर बोलायचे का? ते आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात ते त्यांनी येऊन सांगावे.
कुंभमेळ्यात एकही जिहादी येता कामा नये
नीतेश राणे म्हणाले, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. सध्या रमजान सुरू आहे. त्यांच्या अन्नपदार्थांची दुकाने लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवा. एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणमध्ये असे लिहिले आहे की, काफिरांकडून काहीही घ्यायचे नाही. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही जे काही करतो ते त्याहून वेगळे आहे का? मी कुराम 2 वेळा वाचले. 10 टक्के जास्त जकात द्या असे त्यात नमूद आहे. तो पैसा जिहादसाठी वापरतात. इतरांचा धर्म कमी करून स्वतःचा धर्म वाढवावा असेही त्यात नमूद आहे. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचे का? त्यामुळे कुंभमेळ्यात एकही जिहादी येता कामा नये.
बाहेर दुकानाचे नाव वेगळे अन् आत अब्दुल
नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना पुढे म्हणाले, सध्या कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. मी तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. पण सिंहस्थ कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. तिथे दुकानावर नाव वेगळे होते, पण आतमध्ये अब्दुल बसला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशभरात हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू विकत घेण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत.
मी इथे आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून आलो आहे. कुंभमेळ्यावर लक्ष ठेवा. इथे कुणी स्टॉल लावण्यासाठी आले तर तो उखडून टाका. आम्ही वर मंत्रालयात बसलो आहोत. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. आपल्या राज्यात लव्ह जिहाद विरोधात सर्वात कडक कायदा असेल, असेही नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Only Hindus Should Put Stalls in Nashik Kumbh Mela: Minister Nitesh Rane VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!
- महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, LPG चे वाढविले उत्पादन; छगन भुजबळांची माहिती
- राहुल गांधींचा कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले??
- Vijay Wadettiwar : जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा; विजय वडेट्टीवार यांची मागणी