प्रतिनिधी
मुंबई : टेरर फंडिंग करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर, अशी घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजीवर महाराष्ट्रात तीव्र संताप उसळला असून राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. Nitesh Rane aggressive against Pakistan Zindabad
भाजप नेते नितेश राणे यांनी या घोषणा देणा-या पीएफआय समर्थकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, यापुढे कोणी पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावले तर ते परत घरी जाणार नाहीत, असा इशारा राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरू. गरज वाटल्यास घरात घुसू, असे राणे म्हणाले आहेत.
भारतात राहून जर कोणी पाकिस्तान झिंदाबाच्या घोषणा देत असेल, तर पोलीस खात्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींची हिंमत तोडण्याचे काम पोलिसांनी करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे. आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचे आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणा-यांविरोधात आम्ही लढत आहोत. पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे राणे यावेळी म्हणाले. अशा प्रकारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.
पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लिम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी केली. पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन या आंदोलकांनी केले होते. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्याआधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
Nitesh Rane aggressive against Pakistan Zindabad
महत्वाच्या बातम्या
- India Forex Reserve : परकीय चलनसाठा 5.22 अब्जांच्या घसरणीसह दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर
- New Telecom Bill : व्हॉट्सअॅप कॉलसाठीही द्यावे लागणार पैसे, सरकारने मागितल्या लोकांकडून सूचना, जाणून घ्या काय आहे नवीन दूरसंचार विधेयकात?
- दसरा मेळावा : शिवसेनेचे दोन गटांमध्ये झुंज; मित्र पक्षांच्या गोटात ताकदीच्या घटी-वाढीचा आनंद!!
- ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!; पहिली फेरी जिंकली, पण पुढे काय?