• Download App
    लव्ह जिहादवर चर्चेचे सुप्रिया सुळेंचे आव्हान नितेश राणेंनी स्वीकारले!!; सुप्रिया सुळे कसा प्रतिसाद देणार?? Nitesh rane accepts open challenge of supriya sule to discuss love Jihad matters on an open forum, how supriya sule will respond??

    लव्ह जिहादवर चर्चेचे सुप्रिया सुळेंचे आव्हान नितेश राणेंनी स्वीकारले!!; सुप्रिया सुळे कसा प्रतिसाद देणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : लव्ह जिहादच्या सामाजिक अपप्रवृत्ती आणि गंभीर मुद्द्यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये हिंदू समाजाचे महामोर्चे निघाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह म्हणजे माहिती आहे. जिहाद म्हणजे माहिती आहे. पण लव्ह जिहादचा अर्थ आपल्याला कळत नाही, असे सांगत लव जिहादचे वास्तव नाकारले होते. Nitesh rane accepts open challenge of supriya sule to discuss love Jihad matters on an open forum, how supriya sule will respond??

    कोणत्याही जाती धर्मातल्या विवाहाला आपण पुरोगामी महाराष्ट्रात कसा काय विरोध करू शकतो??, असे विचारत सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही ऑक्सफर्ड डिक्शनरीत नाही. या विषयावर आपण कोणाशीही चर्चा करायला तयार आहोत, असे जाहीर आव्हानही दिले होते.


    लव्ह जिहादवर शरद पवार का बोलत नाहीत?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल


    आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. लव्ह जिहादच्या गंभीर मुद्द्यावर आपण सुप्रिया सुळे यांच्याशी जाहीर चर्चा करायला तयार आहोत. त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी. आपण त्यांना लव्ह जिहादच्या सर्व घटना पुराव्यानिशी सांगू. लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या हिंदू मुलींची भेटही घालून देऊ. कोणत्याही जाती धर्मात कोणीही विवाह करायला हरकत नाही. पण प्रेमाच्या नावाखाली हिंदू मुलींचा कसा धार्मिक छळ होतो, याची उदाहरणे आपण त्यांना पटवून देऊ. लग्नापूर्वी अमर असणारा नंतर अमीर कसा होतो आणि हिंदू मुलींना फसवून कसा छळतो हे आपण त्यांना सांगू. हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून त्यांना मुस्लिम कुटुंब हिंदू सणवार पाळू देत नाही. किंबहुना तिची हत्या करण्यापर्यंत त्या लोकांची मजल कशी जाते??, हे पुराव्यासह सुप्रिया सुळे यांना सांगू, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

    लव्ह जिहादची खात्री पटल्यानंतर सुप्रिया सुळे देखील आमच्याशी खांद्याला खांदा लावून लव्ह जिहाद विरुद्ध लढतील, असा टोलाही नितेश राणे यांनी हाणला आहे. सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवर चर्चा करण्याचे आव्हान तर दिले आहे, पण आता नितेश राणे यांनी समोर येऊन हे आव्हान स्वीकारल्यानंतर त्या नितेश राणे यांच्या प्रतिआव्हानाला कसा प्रतिसाद देतात??, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

    Nitesh rane accepts open challenge of supriya sule to discuss love Jihad matters on an open forum, how supriya sule will respond??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस