विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दक्षिण महाराष्ट्राच्या दुष्काळीपट्ट्यासाठी वरदान ठरलेल्या नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने
3591.46 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे या प्रकल्पाला गती येणार असून भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होईल. nira devghar irrigation project
भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडून निरा देवधर प्रकल्पाला गुंतवणुकीची मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.
दक्षिण महाराष्ट्रात जाणारे बहुतांश पाणी बारामती पट्ट्यातच खेचून घेऊन वापरले जात होते. त्यामुळे बारामती पट्ट्याचा विकास झाला, पण फलटण, माळशिरस सारख्या एकेकाळच्या समृद्ध भागाला दुष्काळाचा फटका बसला. आता पाण्याच्या न्याय्य वाटपाच्या दृष्टीने भाजप सरकारने मोठे प्रयत्न केले आणि त्यातूनच नीरा देवधर प्रकल्पासारख्या दक्षिण महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या प्रकल्पाला केंद्र सरकारने 3591.46 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अंतिम मान्यता दिली.
याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले, तसेच या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.
nira devghar irrigation project
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!