• Download App
    पारनेरच्या तहसीलदार देवरे यांनी मला रात्री- अपरात्री आत्महत्या करत असल्याचे मॅसेज केले; आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांचे उत्तर|Nilesh Lanke’s answer On the audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore

    पारनेरच्या तहसीलदार देवरे यांनी मला रात्री- अपरात्री आत्महत्या करत असल्याचे मॅसेज केले; आरोपांबाबत आमदार निलेश लंके यांचे उत्तर

    वृत्तसंस्था

    अहमदनगर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मला सुद्धा रात्री- अपरात्री मॅसेज करू आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. देवरे यांचे आरोप आमदार निलेश लंके यांनी खोडून काढले आहेत.Nilesh Lanke’s answer On the audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore

    पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना जबाबदार ठरविले आहे. आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे.



    तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे, असे निलेश लंके यांनी म्हटलंय. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचा आरोप लंके यांनी केला.

    त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे आमदार लंके यांनी म्हटलंय. निलेश लंके यांच्या या उत्तरावरुन आता हे प्रकरण कुठलं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    Nilesh Lanke’s answer On the audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस