• Download App
    वाटीतलं ताटात, अजितदादा समर्थक निलेश लंके तुतारी हातात घेऊन सुजय विखेंविरोधात नगरच्या मैदानात!! Nilesh lanke ditched ajit pawar, will contest loksabha election from nagar on the ticket of sharad pawar's NCP

    वाटीतलं ताटात, अजितदादा समर्थक निलेश लंके तुतारी हातात घेऊन सुजय विखेंविरोधात नगरच्या मैदानात!!

    विशेष प्रतिनिधी

    नगर : अखेर वाटीतलं ताटात आलं… अजितदादा समर्थक निलेश लंके तुतारी हातात घेऊन सुजय विखेंविरोधात मैदानात उतरले!! पारनेरचे अजित पवार समर्थक आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तुतारी चिन्ह हातात घेऊन त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखे पाटलांना आव्हान दिले. Nilesh lanke ditched ajit pawar, will contest loksabha election from nagar on the ticket of sharad pawar’s NCP

    निलेश लंके हे काही दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे देखील सुजय विखे पाटलांच्या विरोधात तगडा उमेदवार नव्हता. कारण नगर जिल्ह्यातले सगळे राष्ट्रवादीचे समर्थक अजितदादांबरोबर निघून गेले. त्यामुळे पवारांकडे उमेदवारांचा खडखडाटच होता. अशावेळी निलेश लंके यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे आपोआपच पवारांना आयता उमेदवार मिळाला.



    अजितदादांमुळे मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके थोडे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण आपल्या कार्यकर्त्यांना सुजय विखे पाटलांनी आणि विखे कुटुंबीयांनी खूप त्रास दिला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी नगर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आपल्याला उतरावे लागले आहे, असे सांगत त्यांनी आमदारकीचा राजीनामा सादर केला.

    नगरची जागा भाजपाकडून आपल्या राष्ट्रवादीकडे खेचून घ्यावी, अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे लावून धरली होती. पण निलेश लंकेची ही मागणी महायुतीतला राजकीय व्यवहार बघता पूर्णपणे अव्यवहारी होती. भाजप सारख्या महायुतीतल्या खऱ्या दादा पक्षाकडून अजितदादा नगर सारखी महत्त्वाची जागा खेचून घेणे शक्य नव्हते. जी जागा अखंड राष्ट्रवादीला विखे पाटलांकडून खेचून घेता आली नाही, ती जागा अचित अजित पवार विखे पाटलांकडून खेचून घेणे सर्वस्वी अशक्य होते, तरी देखील निलेश लंकेने तो हट्टा धरला होता.

    अजितदादांनी आपला हट्ट पुरवला नाही निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेतली. शरद पवारांना देखील आयता उमेदवार हाती लागल्यामुळे त्यांनी ताबडतोब निलेश लंकेची उमेदवारी सुजय विखेंविरोधात जाहीरही करून टाकली.

    Nilesh lanke ditched ajit pawar, will contest loksabha election from nagar on the ticket of sharad pawar’s NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते