प्रतिनिधी
मुंबई : ईडीचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे एटीएम मधले आहेत. अनेक अधिकारी उत्तरप्रदेशात तिकीट घेऊन निवडणूक लढवतात एका अधिकाऱ्याने 50 उमेदवारांचा खर्च केला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले… Next date given by Sanjay Raut
- किरीट सोमय्या वसुली एजंट.
- आमच्या घरात घुसलात. तुमच्या घरात घुसू.
- शिवसेनेलाही धाड घालण्याचा अधिकार आहे.
- इन्कम टॅक्स आणि ईडी आत्तापर्यंत भाजपचा 50 नेत्यांची नावे दिली आहेत.
- भाजपच्या कोणत्या नेत्याकडे किती संपत्ती आहे याचे पुरावे थेट पंतप्रधानांना थोड्याच दिवसात देणार. अधिक मोठा गौप्यस्फोट करणार.
- कडी ऑफिसर आणि एजंट नेटवर्क बिल्डर आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांना घाबरवतात. ते खंडणी गोळा करतात.
- त्याची विस्तृत माहिती पंतप्रधानांना दिली आहे माझ्याकडे आहे. हे पुरावे पत्रकारांना पण दिले आहेत जितेंद्र चंद्रलाल नवलानी त्याच्या त्याच्या 7 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त बिल्डर कडून खंडणी वसूल केली त्याचा पॅन नंबर मी देतो आहे.