• Download App
    आमदार अपात्रतेच्या घडामोडींना माध्यमांनी आणला वेग; अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याची चालवली घाई!! News driving the Pawar loyalist narrative that Ajit Pawar will become Chief Minister

    आमदार अपात्रतेच्या घडामोडींना माध्यमांनी आणला वेग; अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याची चालवली घाई!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आल्याच्या बातम्या देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची माध्यमांनी घाई चालविली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपण एक-दोन दिवसांत नोटीसा पाठवून त्यांच्याकडून उत्तर घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले, पण माध्यमांनी मात्र ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. News driving the Pawar loyalist narrative that Ajit Pawar will become Chief Minister

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातले 16 आमदार अपात्र होणार आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचे पद जाणार हे गृहीतक माध्यमांनी मांडले आहे आणि त्या गृहीतकाचा पुढचा भाग म्हणून भाजपच्या ए, बी, सी आणि डी अशा स्ट्रॅटेजी परस्पर माध्यमांनी जाहीर करून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची घाई चालवली आहे.

    त्याचवेळी माध्यमांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, इतकेच काय पण नितीन गडकरींचे हे नाव सरप्राईज एलिमेंट म्हणून पुढे केले आहे.

    अर्थात या सगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत, जी सूत्रे भाजपच्या गेल्या 9.5 वर्षांच्या राजवटीत कधीच बरोबर ठरली नाहीत, त्या सूत्रांच्या हवाल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या माध्यमांनी दिल्याने त्या कितपत विश्वासार्ह आहेत, याविषयी सोशल मीडिया शंका व्यक्त होत आहे.



    एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उठाव केला आणि ते मुख्यमंत्री बनले. म्हणजे त्यांना भाजपने मुख्यमंत्री बनविले. एकनाथ शिंदे यांच्या त्या पदाची मराठी माध्यमांना भनक देखील लागली नव्हती. एकनाथ शिंदेंचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून जाहीर करेपर्यंत माध्यमे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या चालवत होती.

    अजित पवार भाजपच्या गोटात येऊन उपमुख्यमंत्री झाले त्यांच्याबरोबर 8 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यावेळी देखील अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद हवे आहे आणि त्याच्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत, अशा बातम्या माध्यमे देत होती. अजित पवार राजभवनावर पोहोचल्यानंतर ते शपथ घेणार असल्याच्या बातम्या देणे माध्यमांनी सुरू केले. म्हणजे अजित पवार भाजपच्या गोटात येऊन उपमुख्यमंत्री होणार याची देखील अखेरच्या क्षणापर्यंत मराठी माध्यमांना त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने साधी भनकही लागू शकली नव्हती.

    आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार. त्यामुळे शिंदे पायउतार व्हावे लागणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा पवारनिष्ठ नॅरेटिव्ह चालविणाऱ्या बातम्या माध्यमांनी सुरू केल्या आहेत.

    News driving the Pawar loyalist narrative that Ajit Pawar will become Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!