विशेष प्रतिनिधी
मुंबई – ताम्हिणी घाटामधील वन्यजीव अभयारण्यामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. ‘हेमिडॅक्टिलस’ कुळातील ही पाल या परिसराला प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिचे नामकरण ‘हेमिडॅक्टिलस ताम्हिणीएन्सिस’ असे केले आहे. New species of reptile found in Tamhini
‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’सारख्या संस्था या दुर्लक्षित असलेल्या जीवांवर संशोधनाचे काम करत आहेत. याच संस्थेतील संशोधक अक्षय खांडेकर, तेजस उद्धव ठाकरे आणि इशान अग्रवाल यांनी ‘ताम्हिणी अभयारण्या’मधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
उत्तर सह्याद्रीमध्ये ४९.६२ चौरस किमी परिसरात विस्तारलेल्या ‘ताम्हिणी अभयारण्या’मध्ये पालीची नवी प्रजात सापडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात उभयचरांविषयी काम करणाऱ्या संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. ‘झूटॅक्सा’ या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित केले. ही नवी प्रजात ‘हेमिडॅक्टिलस’ या पोटजातीमधील असून, यामध्ये भारतात सुमारे ४६ प्रकारच्या पाली सापडतात.
‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’मधील संशोधकांनी या पालीची डीएनए आणि आकारशास्त्राचे आधारे तपासणी केली. त्या वेळी ही पाल ‘हेमिडॅक्टिलस आरोनबाउरी’ या पालीपेक्षा वेगळी असून, ती विज्ञानाकरिता नवीन असल्याची माहिती त्यांना मिळाली.
New species of reptile found in Tamhini
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले