प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाच्या नव्या डेल्हा वेरिएंटची धास्ती वाढत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. new restrictions in vidarbh and marathwada dists
जालना जिल्ह्यात उद्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 चे पहाटे 5 पर्यंत संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना सायंकाळी चार पर्यंत सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि अस्थापना पूर्णपणे बंद असतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत. दरम्यान या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमण्यास देखील मनाई असणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर शनिवार, रविवार पूर्ण बंद असणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट, बँका ४.०० वाजेपर्यंत सुरु असणार आहेत. तर शाळा कॉलेज, शिकवणी, मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे.
असेच आदेश चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील लागू असणार आहेत.
new restrictions in vidarbh and marathwada dists
महत्त्वाच्या बातम्या
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन
- Ravishankar Vs Twitter : एआर रहमानच्या या गाण्यामुळे झाले होते केंद्रीय मंत्र्यांचे अकाउंट लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण