• Download App
    New loksabha majority mark will be 409 400 पाराचा आता फक्त नारा नाही उरणार, ती गरज बनणार, देशाचे राजकारण 360° मध्ये बदलणार!!

    400 पाराचा आता फक्त नारा नाही उरणार, ती गरज बनणार, देशाचे राजकारण 360° मध्ये बदलणार!!

    New loksabha

    नाशिक : केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी महिला आरक्षण सुधारणा कायदा म्हणजेच नारीशक्ती वंदन 2029 मध्येच अस्तित्वात आणणार, त्यावेळी 400 पारचा नारा हा फक्त नारा उरणार नाही तर ती गरज बनणार आणि देशाचे राजकारण 360 अंशांमध्ये बदलणार. हे फार मोठे राजकीय परिवर्तन देशांमध्ये येत्या तीन वर्षांमध्ये घडवून येणार.New loksabha majority mark will be 409

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासाठी प्रयत्न केले असून संसदेच्या याच अधिवेशनात नारीशक्ती वंदन विधेयकातल्या सुधारण्याचे विधेयक मांडून ते मंजूर करून घेतले जाणार आहे. सर्व पक्षांचा यात सहभागाने पाठिंबा मिळवायचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.



    – बहुमताचा कडा 409

    कारण नारीशक्ती वंदन म्हणजेच महिला आरक्षण सुधारणा कायदा अंमलात आल्यानंतर देशाच्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या 816 होणार, त्यापैकी 273 खासदार महिला असणार, त्यामुळे लोकसभेतले सरकारच्या बहुमताचे सगळे अंकगणितच बदलून जाणार आणि त्या पाठोपाठ देशातले राजकीय समीकरण अमुलाग्र बदलणार. ज्याअर्थी लोकसभेतल्या खासदारांची संख्या 816 होणार, त्याअर्थी बहुमताचा आकडा 409 होणार. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीत दिलेला आपकी बार 400 पार हा नारा केवळ नारा उणार नाही. किंवा त्या नाऱ्याची टिंगल टवाळी सुद्धा करता येणार नाही तर तो नारा म्हणजे देशावर राज्य करायचे असेल तर 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे ही गरज निर्माण होईल. आणि तिथेच देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांची खरी कसोटी लागेल. देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना उमेदवार भरपूर मिळतील पण त्यातले निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार वेचून काढणे कठीण होईल. मतदारसंघांची संख्या वाढण्याबरोबरच प्रचंड भौगोलिक फेररचना होईल त्यामुळे मतदारसंघांमधली जातीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक सगळीच समीकरणे बदलून जातील. जुनी समीकरणे मोडून पडतील आणि नवीन समीकरणे तयार होतील. या नव्या समीकरणांशी जे राजकीय पक्ष लवकरात लवकर जुळवून घेतील, त्यांना यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल अन्यथा केवळ संकुचित प्रादेशिक किंवा जातीय समीकरणांवर टिकून राहिलेले छोटे मोठे पक्ष एकतर अस्तंगत होतील किंवा मोठ्या राजकीय पक्षांच्या आश्रयाला जातील. कारण स्वतःचे राजकारण तरंगत ठेवण्यासाठी त्यांना दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही.

    – स्थिर किंवा अस्थिरेत रुपांतर

    अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेस यांच्यासारखे दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्ष आणखी बलाढ्य होऊन देशाचे राजकारण स्थिर तरी होईल किंवा प्रादेशिक पक्षांनी आपला जोर वाढविला तर देशाचे राजकारण जास्तीत जास्त अस्थिरतेच्या गर्तेत तरी ढकलले जाईल. कारण लोकसभेचे मतदारसंघ वाढल्यानंतर होणाऱ्या फेररचनेत त्यांचा भौगोलिक आकार कमी होईल. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना सुद्धा जास्त जागा लढवायची आणि जिंकून यायची संधी मिळेल. त्यामुळे कदाचित प्रादेशिक पक्षांचेही राष्ट्रीय राजकारणात सध्या आहे त्यापेक्षा अधिक महत्त्व वाढू शकेल पण हा सगळा खेळ पक्ष संघटनांचा असेल ज्याची संघटना बळकट, त्याचे यश आज मूलमंत्र असण्याची शक्यता आहे. कारण 816 खासदार निवडून आणणे हा केवळ कुठल्या लोकप्रियतेच्या लाटेचा परिणाम उरणार नाही, तर ती लाट निर्माण करण्यासाठी, ती लाट टिकवून ठेवण्यासाठी आणि तिचा परिणाम मिळविण्यासाठी पक्षाची संघटना मजबूत लागेलच त्यासाठी दुसरा कुठला पर्याय निर्माण व्हायची शक्यता नाही.

    New loksabha majority mark will be 409

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य- माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले; सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये फिरतोय

    MCOCA : दुधामध्ये घातक भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ लागणार; अंधेरीतील भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

    तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वर वाताहत!!