विशेष प्रतिनिधी
मुंबई : काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार तसेच राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. Devendra Fadnavis
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे.
विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. ग्रामीण भागातील नव कल्पना असलेल्या तरुणांनाचा उद्योगात सहभाग वाढवणार असून उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप सुरू करण्यासाठी सहकार्य करणार.शासकीय आणि खाजगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर निर्माण करणारे बनवणार अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
नवउद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा ४७१ स्टार्ट अप होते आज देशात १ लाख ५७ हजार आहेत. महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६००० स्टार्ट अप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
New Draft of Start Up Policy Announced by Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis सुशासन…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना धक्का
- Sheikh Hasina : बांगलादेशात शेख हसीना यांच्या राजवटीत निदर्शकांवर पोलिसांची क्रूरता
- Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीविरुद्ध चार एफआयआर दाखल
- satellites : भारतीय अवकाश क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात, दोन स्वदेशी स्टार्टअप्सनी केले उपग्रह प्रक्षेपित