• Download App
    नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोदी - शहा फडणवीस यांनी मुख्यमंत्री केले!!New Chief Minister Eknath Shinde: Modi-Shah Fadnavis made Balasaheb's Shiv Sainik Chief Minister

    नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोदी – शहा फडणवीस यांनी मुख्यमंत्री केले!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट आल असून देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी राजभवन मधील पत्रकार परिषदेत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली ऐतिहासिक दुर्मिळ घटना आहे,असे वक्तव्य करून भाजपचे आभार मानले आहेत. New Chief Minister Eknath Shinde: Modi-Shah Fadnavis made Balasaheb’s Shiv Sainik Chief Minister

    याच पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची सविस्तर भूमिका मांडली. एकनाथ शिंदे म्हणाले : आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व कधीही सोडले नाही. सोडणार नाही. माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मंत्रिपदावर गेला. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये काही निर्णय घेता येत नव्हते. काही अडचणी होत्या.

    आमचे महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद होते. त्यामुळे आम्ही पक्षप्रमुखांकडे परत भाजपशी युती करण्याची मागणी केली होती. परंतु, दुर्दैवाने आमचे ऐकले नाही. माझ्याबरोबर जे 50 आमदार आहेत ते आपापल्या मतदारसंघातले मोठे नेते आहेत. प्रबळ नेते आहेत. त्यांचा मतदार संघाचा विकास थांबला होता. निधी मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आम्हाला पाठिंबा दिला आमच्या समवेत ते आले. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आजच्या राजकारणात हा अतिशय दुर्मिळ गुण आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री करून दाखवले आहे. आम्ही कोणत्याही पदासाठी कधीच संघर्ष केला नव्हता. आमचा वैचारिक विरोध काँग्रेस-राष्ट्रवादीला होता आणि तो यापुढेही कायम राहील.

    शिवसेनेतले आणखी आमदार बरोबर येतील. बाकी अपक्षही बरोबर येतील, असा विश्वास नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांच्या एकट्याचाच राजभवनात सायंकाळी साडेसात वाजता शपथविधी होणार आहे.

    New Chief Minister Eknath Shinde: Modi-Shah Fadnavis made Balasaheb’s Shiv Sainik Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस