• Download App
    उदयनराजे भोसले यांचा नव्या कोऱ्या कारसोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल। New BMW car in Udayanraje's convoy, same odd number 007, photo is viral in Social Media

    उदयनराजे भोसले यांचा नव्या कोऱ्या कारसोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    वृत्तसंस्था

    सातारा : भाजपा नेते आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा नव्या कोऱ्या कारसोबत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दसऱ्याच्या शुभ महुर्तावर त्यांनी नवी बीएमडब्लू कार खरेदी केल्याचे दिसते.  New BMW car in Udayanraje’s convoy, same odd number 007, photo is viral in Social Media

    नेहमी उदयनराजेंच्या स्टाईलची चर्चा होते, त्यांच्या विधानांची चर्चा होते, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची चर्चा होते. तसेच, त्यांच्या कार कलेक्शनचीही चर्चा होत असते. त्यांच्या कारच्या ताफ्यात आता बीएमडब्ल्यू कारची भर पडली आहे. उदयनराजेंनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या कारसह फोटो शेअर केला.



    उदयनराजेंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, ते कधी तुम्हाला गाडी चालवताना तर कधी कार्यकर्त्यांसोबत गाडीत प्रवास करताना दिसतात. तर, कधी गाणे लावून सुरेल संगीताचा आनंद घेताना दिसतात.

    विशेष म्हणजे त्यांच्या सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंच्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर आहे. पुण्यातून गाडी खरेदी करतानाचा त्यांचा शोरुममधील फोटो व्हायरल झाला. त्याला अनेकांनी दाद दिली.  उदयनराजेंच्या ताफ्यामध्ये ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार आहेत. तर त्यांच्या पत्नी दमयंतीराजेंकडे पोलो ही कार आहे. आता, बीएमडब्लू कंपनीची टेक्स फाईव्ह हे कारचे मॉडेल असून या कारची किंमत १ कोटी रुपये आहे.

    New BMW car in Udayanraje’s convoy, same odd number 007, photo is viral in Social Media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस